धक्कादायक! नागपूरमध्ये दगडाने डोके ठेचून गुंडाची हत्या; आरोपीला अटक

नागपूर (Nagpur) शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. शहरात पुन्हा एकदा एका गुंडाची हत्या दगडाने ठेचून हत्या (Murder) करण्यात आली आहे. कपिलनगरमधील आवळेनगर भागात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. शैलेश बालाजी देशभ्रत्तार असं हत्या करण्यात आलेल्या गुंडाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी राकेश मोतीलाल पटेल याला अटक केली आहे. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Representational Image | (Photo Credits: PTI)

नागपूर (Nagpur) शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. शहरात पुन्हा एकदा एका गुंडाची हत्या दगडाने ठेचून हत्या (Murder) करण्यात आली आहे. कपिलनगरमधील आवळेनगर भागात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. शैलेश बालाजी देशभ्रत्तार असं हत्या करण्यात आलेल्या गुंडाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी राकेश मोतीलाल पटेल याला अटक केली आहे. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत शैलेशवर यापूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोपी राकेश आणि शैलेश यांनी आवळेनगरमध्ये मद्यपान केलं. यावेळी शैलेशने राकेशला शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे राकेशने शैलेशचे डोके दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेनंतर आरोपी राकेशने घटनास्थळावरून पळ काढला. (हेही वाचा - औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्याने 30 वर्षीय शेतक-याची गळफास लावून आत्महत्या)

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताचं कपिलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शैलेशचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी फरार आरोपी राकेशला या प्रकरणी बेड्या घातल्या आहेत. दरम्यान, यापूर्वीदेखील नागपूरमध्ये गुंडाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला होता.

याशिवाय दोन आठवड्यांपूर्वी पुणे शहरातील खराडी परिसरात कुख्यात गुंडाची दगडांने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. शैलेश घाडगे असं या मृत गुंडाचं नाव होतं. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement