मावळ: ट्रोलर्सना पार्थ पवार याचं प्रत्युत्तर, 'बोलण्यावर नाही माझ्या कामावर लक्ष द्या'

सोशल मिडीयातून पार्थ पवारच्या पहिल्या भाषणाची खिल्ली उडवल्यानंतर आता पार्थ पवारने त्याच्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Parth Pawar (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रातील राजकारणामध्ये 'पवार' कुटुंबीय हे पॉवरफूल कुटूंबातील एक मानले जाते. यंदाच्या लोकसभा निवडणूकांमध्ये शरद पवारांचे (Sharad Pawar) नातू आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा मुलगा पार्थ पवारला (Parth Pawar)  मावळ मतदार (Maval) संघातून लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. पार्थ पाहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election) लढत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांसोबतच महाराष्ट्रभरातील जनतेचे त्याच्याकडेलक्ष लागले होते. मात्र नुकत्याच एका जाहीर कार्यक्रमामध्ये भाषण करताना पार्थची तारांबळ उडल्याने सोशल मीडियात त्याला ट्रोल करण्यात आले होते.

सोशल मिडीयातून पार्थ पवारच्या पहिल्या भाषणाची खिल्ली उडवल्यानंतर आता पार्थ पवारने त्याच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. वडगाव येथे पत्रकारांशी बोलताना पार्थ म्हणाला," माझ्या पहिल्या भाषणात 2-3 चूका झाल्या मात्र त्याचा अर्थ असा नाही की मी ट्रोलर्सवर लक्ष केंद्रीत करणार. चांगली भाषणं करणारे सारेच चांगली कामं करतात असे नाही. मी कमी बोलतो आणि जास्त काम करतो. असे पार्थने ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले आहे. व्हिडिओ: पार्थ पवार यांचं पहिलं भाषण; लिहून आणलेलं वाचतानाही उडाली धांदल, इंग्रजी उच्चारात मराठी बोलल्याने उपस्थितांचे मनोरजंन

पार्थ पवारांची मावळ मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच पार्थ कार्यकर्त्यांचे समोर गेले होते. येथे अजित पवार, शरद पवार उपस्थित होते. स्टेजवरील मान्यवर आणि समोर असलेले कार्यकर्ते पाहून पार्थ पवार जरा घाबरले होते. काही चूकलं तर माफ करा असं आवाहन त्यांनी भाषण सुरू होण्यापूर्वीच केलं होतं. मावळ लोकसभा मतदारसंघ: पार्थ पवार यांच्यासमोर लोकसभा निवडणूक 2019 मध्ये विजयासाठी ही आहेत आव्हानं

महाराष्ट्रात यंदा चार टप्प्यामध्ये लोकसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत. या निवडाणूकांचा निकाल 23 मे 2019 दिवशी लागणार आहे.