Lonavala Tourist: 15 ऑगस्ट रोजी कोणीही लोणावळ्यात येऊ नये; पोलिसांकडून पर्यटकांना आवाहन
दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अनेक पर्यटक लोणावळ्यात गर्दी करत असतात. परंतु, यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना लोणावळ्यात येण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. या नियमाचे उल्लघंन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील पोलिसांनी दिला आहे.
Lonavala Tourist: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्ट रोजी कोणीही लोणावळ्यात (Lonavala) येऊ नये, असं आवाहन पोलिसांकडून पर्यटकांना करण्यात आलं आहे. दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अनेक पर्यटक लोणावळ्यात गर्दी करत असतात. परंतु, यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना लोणावळ्यात येण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. या नियमाचे उल्लघंन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील पोलिसांनी दिला आहे.
दरम्यान, यासंदर्भात अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी सांगितले की, यंदा स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शनिवार येत आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी येत आहे. लागोपाठ दोन सुट्ट्या मिळाल्याने अनेक पर्यटक लोणावळ्यात पर्यटनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी होऊ शकते. याचं पार्श्वभूमीवर लोणावळ्यात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. (हेही वाचा -Harshvardhan Jadhav Appeals For Divorce: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा पत्नी संजना जाधव यांच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल)
हिरवागार डोंगर, उंच डोंगरावरून वाहणारे धबधबे, आदी दृश्य पाहण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात येत असतात. पावसाला सुरूवात झाल्यानंतर काही दिवसांतचं पर्यटकांनी लोणावळ्यात गर्दी करण्यास सुरूवात केली होती. आतापर्यंत नियमांचे पालन न करणाऱ्या 300 पेक्षा जास्त पर्यटकांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे नियमांची पायमल्ली करणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आवाहनदेखील यावेळी मनोज यादव यांनी केलं आहे.