Disha Salian: दिशा सालियान प्रकरणी नितेश राणे यांचे पुन्हा ट्वीट, काळ्या रंगाच्या मर्सिडीजवरुन पुन्हा प्रश्नचिन्ह

या ट्विटमध्ये त्यांनी काळ्या रंगाच्या मर्सिडीजवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Nitesh Rane (Photo Credits: PTI)

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची मॅनेजर दिशा सॅलियन (Disha Salian) हिच्या मृत्यूवरुन भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सूचक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी काळ्या रंगाच्या मर्सिडीजवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दिशा सालियान हिच्या घराबाहेर एक काळी मर्जिडीज (Mercedes) दिसते. तशीच एक मर्सिडीज सचिन वाझेकडेही आहे. त्यामळे दिशा प्रकरणाशी त्याचा काही संबंध आहे का? असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, दिशा सॅलियन हिच्या मृत्यू प्रकरणी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत काही आरोप केले होते. या आरोपांची दखल घेत राज्य महिला आयोगाने पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, दिशा सॅलियन प्रकरणात मालवणी पोलिसांची भूमिका पहिल्यापासूनच संशयास्पद राहिली आहे. आता त्यांना या प्रकरणात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिशा सोबत राहणारा राहित राय हा 8 तारेखेच्या रात्री उपस्थित होता. तो या प्रकरणात काहीच का बोलत नाही? असा सावालही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

नितेश राणे यांनी पुढच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, दिशा प्रकरणात मुंबईच्या महापौरांनी राज्य महिला आयोग आणि मालवणी पोलीस यांना पत्र लिहीले आहे. ज्यात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याचा अर्थ राज्य सरकारकडून 8 जूनच्या रात्री काहीही झाले नसल्याचे दाखवण्याचाच हा प्रयत्न आहे. असो ते किमान आपली कबर खोदत आहेत याचा आनंद आहे.

ट्विट

काळ्या रंगाच्या मर्जिडीजचा उल्लेख करत नितेश राणे म्हणतात की, आठ तारखेच्या रात्री दिशाला काळ्या मर्जिडीजमधून मालाड येथील घरी नेण्यात आले. सचिन वाझे याच्याकडेही अशाच प्रकारची मर्सिडीज आहे. जी सध्या तपास यंत्रणांकडे आहे. ही तीच कार आहे का? वाझे याला 9 जून रोजी सेवेत पुन्हा रुजू करुन घेण्यात आले. संबंध? असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.