Pune ISIS Module Case: पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणी एनआयएकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल

त्यांनी सल्फ्यूरिक एसिडसाठी सिरका हा कोडवर्ड ठेवला होता. असेटॉन केमिकल्ससाठी रोज वॉटर तर हायड्रोजन प्यारॉक्सॉइडसाठी शरबत कोडवर्ड होता.

NIA | (Photo Credits: Twitte/ANI)

पुणे आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात (Pune ISIS Module Case) एनआयएकडून (NIA) विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. एनआयएनं केलेल्या तपासात मॉड्यूलमधील आरोपी दहशतवादी (Terrorist) उच्चशिक्षित असल्याचं समोर आलं आहे. अटक आरोपी जुल्फिकारला मल्टी नॅशनल कंपनीत ३१ लाख रुपयांच्या पॅकेजवर कार्यरत असल्याचे तपासात माहिती मिळत आहे या आरोपींनी देशभरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडण्याची योजना तयार केली होती. या प्रकरणात आरोपीवर एनआयएने यूएपीए, विस्फोटक पदार्थ अधिनियम आणि इतर कलमांनुसार चार्जशीट दाखल केले आहे. (हेही वाचा - Fire Broke Out In Firecracker Market In Mathura: मथुरामध्ये फटाका मार्केटला भीषण आग, पोलिसांसह 12 जण भाजले; अनेकांची प्रकृती गंभीर)

या अतिरेक्यांनी काही कोडवर्ड तयार केले होते. त्यांनी सल्फ्यूरिक एसिडसाठी सिरका हा कोडवर्ड ठेवला होता. असेटॉन केमिकल्ससाठी रोज वॉटर तर हायड्रोजन प्यारॉक्सॉइडसाठी शरबत कोडवर्ड होता. अतिरेक्यांनी अनेक राज्यात दहशतवादी हल्ला करण्यासाठी रेकी केली होती. त्यासाठी पोलिसांना लक्षात येऊ नये म्हणून दुचाकीचा वापर ते करत होते.

या प्रकरणातील आरोपी जुल्फिकार हा एका मल्टीनेशनल कंपनीत मॅनेजर होता. त्याला तब्बल 31 लाख रुपये वार्षिक पॅकेज होते. अटक केलेल्या सर्वच अतिरेकी उच्चशिक्षित होते. त्यातील कादीर पठाण ग्राफिक डिजाइनर होता.