NIA: दहशतवादी संघटनेशी संबंधाच्या संशयावरुन बोईसर येथून उच्चशिक्षीत तरुणास अटक, एनआयएची कारवाई
या तरुणाचा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांसोबत संबंध असल्याचा संशय एनआयएला आहे. त्यावरुन कारवाई करत एनआयएने या तरुणाला ताब्यात घेतले. हमराज शेख असे ताब्यात घेतलेल्या नाव आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थातच एनआयएने (NIA) राबवलेल्या शोधमोहीमेत बोईसर (Boisar) येथून एका उच्च शिक्षित तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या तरुणाचा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांसोबत संबंध असल्याचा संशय एनआयएला आहे. त्यावरुन कारवाई करत एनआयएने या तरुणाला ताब्यात घेतले. हमराज शेख असे ताब्यात घेतलेल्या नाव आहे. दरम्यान, एनआयएने मुंबईसोबत बंगळुरु येथेही शोधमोहीम राबवली. बंगळुरु येथूनही एका तरुणाला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. त्याचे नाव आरिफ असल्याचे समजते. तो आयएसआयएसचा दहशतवादी असल्याचा आरोप आहे.
देशभरातील विविध ठिकाणचे तरुण आयएसआय आणि अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याची माहिती एनआएकडे प्राप्त झाली आहे. त्यावरुन एनआयएने एक शोधमोहीम राबवली आणि काही ठिकाणी धाडसत्रही सुरु केले. या शोधमोहीमेत पालघर येथील हमराज शेख (वय 24) या उच्चशिक्षित तरुणाला ताब्यात घेण्यात येईल. (हेही वाचा, NIA Search Operations: ISIS, अल-कायदाशी संबंध असल्याचा संशय; एनआयएची मुंबई, बंगळुरु येथे शोध मोहीम)
प्राप्त माहितीनुसार, हमराज शेख या तरुणाला एनआएच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी 8.30 च्या दरम्यान ताब्यात घेतले. हा तरुण पाठिमागील दोन वर्षांपासून बोईसर परिसरात राहात असल्याची माहिती आहे. येथे राहायला येण्यापूर्वी हा तरुण देश आणि जगातील विविध ठिकाणी नोकरी अथवा इतर उद्देशाने फिरुन आल्याचे समजते. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले तेव्हा तो आपल्या वडिलांच्या बोईसर अवधनगर येथील चप्पल दुकानात काम करत होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याला पोलीस स्टेशनला आणण्यात आले. तसेच सोमनाथ पॅराडाईज येथील घराची देखील पोलिसांनी झडती घेतली. दुपारी 4 पर्यंत त्याची चौकशी सुरुच होती. त्याच्याकडून मोबाईल आण लॅपटॉप ताब्यात घेण्यात आले. पुढीलतपासासाठी त्याला मुंबईत नेण्यात आल्याचे समजते.