NEET Paper Leak Case: लातूर येथील शिक्षकास 6 दिवसांची पोलीस कोठडी, नीट परीक्षा पेपर लीक प्रकरण

या प्रकरणाद दोन शिक्षकांना अटक झाली असून त्यांना कोर्टासमोर हजर आले. कोर्टाने त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

NEET Paper Leak Case | (Photo credit: archived, edited, representative image)

NEET Paper Leak Maharashtra Connection: राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) पेपरफुटीच्या देशभरात गाजत असलेल्या प्रकरणाचे कनेक्शन महाराष्ट्रातही असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणाद दोन शिक्षकांना अटक झाली असून त्यांना कोर्टासमोर हजर आले. कोर्टाने त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. नांदेड दहशतवाद विरोधी पथकाने (Nanded ATS) त्यांना लातूर (Latur News) येथून ताब्यात घेतले होते. एटीएसने ताब्यात घेतलेले दोघेही जिल्हा परिषद शिक्षक आहेत. दोघांपैकी संजय जाधव या शिक्षकास पोलिसांनी आज कोर्टासमोर हजर केले होते.

आरोपी प्राथमिक शाळेत उप-शिक्षक

NEET पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेला संजय जाधव हा आरोपी सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता. या शाळेत तो पाठिमागील वर्षभरापासून उपशिक्षक म्हणून काम पाहात होता. एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या व्यक्तीचे देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षेतील गैरप्रकारात नाव आल्याचे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. तसेच, या घटनेमुळे अवघ्या सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे. (हेही वाचा, NEET Paper Leak Latur Connection: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे लातूर कनेक्शन, दोघे एटीएसच्या ताब्यात; बिहारनंतर महाराष्ट्रात खळबळ)

लातूर येथील दिल्ली पोलीस स्टेशनमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, नीट परीक्षा पेपरफुटीचे लातूर कनेक्शन पुढे येताच लातूरमधील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी जलील खान पठाण यास या आधिच अटक झाली आहे. तर, दुसरा संजय जाधव याला पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. त्याला कोर्टासमोर आज हजर करण्यात आले. दरम्यान, पोलीस आणि आरोपीचे वकील यांच्यामध्ये कोर्टात युक्तीवाद झाला. दोन्ही बाजू ऐकूण घेतल्यावर कोर्टाने आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली. (हेही वाचा, NEET Paper Leak Case: नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणी CBI द्वारा पहिला FIR दाखल)

दरम्यान, राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET), पूर्वीची ऑल इंडिया प्री-मेडिकल टेस्ट (AIPMT), ही भारतीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांमधील MBBS आणि BDS प्रोग्रामसाठी पात्रता परीक्षा आहे. हे नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे आयोजित केले जाते. NTA, जी एक स्वतंत्र स्वायत्त आणि स्वयंपूर्ण प्रीमियर चाचणी संस्था आहे, त्यापूर्वी ही परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) घेतली होती. भारतातील एमबीबीएस आणि बीडीएस महाविद्यालयांमध्ये 90,000 जागा देणारी ही परीक्षा दरवर्षी मे महिन्यात घेतली जाते. (हेही वाचा, NEET Paper Leak Latur Connection: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे लातूर कनेक्शन, दोघे एटीएसच्या ताब्यात; बिहारनंतर महाराष्ट्रात खळबळ)

काय आहे नीट परिक्षा

तमिळ, मराठी, उर्दू बंगाली, तेलगू, कन्नड आणि आसामी अशा 11 भाषांमध्ये घेतली जाते. परीक्षेचा कालावधी तीन तासांचा आहे आणि उमेदवाराला 180 प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे. परीक्षेचा पेपर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (वनस्पतिशास्त्र आणि प्राणीशास्त्र) या तीन विभागात विभागलेला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif