राष्ट्रवादी काँग्रेसचे बेपत्ता आमदार नितीन पवार, दौलत दरोडा, नरहरी झिरवळ, अनिल पाटील मुंबईत परतले; अजित दादांना नेमका कोणाचा पाठिंबा?

राष्ट्रवादी काँग्रेसचे बेपत्ता आमदार नितीन पवार, दौलत दरोडा, नरहरी झिरवळ, अनिल पाटील मुंबईत परतले आहेत यामुळे अजित पवार यांना नेमका कोणाचा पाठिंबा आहे हा प्रश्न समोर येत आहे.

NCP Missing MLA Returns To Mumbai (Photo Credits: ANI)

महाराष्ट्र सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) शिगेला पोहचला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)  मोठे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजप (BJP) सोबत गेले, इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीच्या आमदारांचे समर्थन आहे असे सांगून त्यांनी सत्ता स्थापन करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.  मात्र अजित पवार यांनी ज्या आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले ते आमदार नेमके आहेत तरी कोण असा प्रश्न समोर येत आहे. सुरुवातीला 22 आमदार आपल्यासोबत आहेत असा दावा अजित यांनी केला होता तर, 4-5 पेक्षा जास्त आमदार अजित दादांसोबत असणार नाहीत अशी माहिती देत पक्षाकडून याचे खंडन करण्यात आले होते. आता हे चार आमदार म्हणजे मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असणारे राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार (Nitin Pawar), दौलत दरोडा (Daulat Daroda), नरहरी झिरवळ (Narhari Zirwal), अनिल पाटील (Anil Patil) हे तर नाहीत ना असा सवाल होता? मात्र त्यावर सुद्धा उत्तर देत हे चारही बेपत्ता आमदार आज पुन्हा मुंबईत परतले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, दौलत दरोडा आणि नितीन पवार यांनी कालच एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण राष्ट्रवादी सोबत असल्याचे सांगितले होते. आज हे दोघेही आमदार मुंबईत परतल्यामुळे पक्षाने सुटकेचा श्वास सोडला आहे. याशिवाय अन्य दोन आमदारांना हरियाणा गुरुग्राम येथील हॉस्टेल मध्ये ठेवण्यात आले आहे. Maharashtra Government Formation Live News Updates: महाराष्ट्रातील सत्तापेचावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

ANI ट्विट

दरम्यान, सत्तास्थापन झाली असली तरी अद्याप भाजपाला बहुमत सिद्ध करता आलेले नाही. यासाठी राज्यपालांकडून 30 नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर ही मुदत देण्याऐवजी तातडीने विधानसभा अधिवशेन घेऊन बहुमत चाचणी करण्यात यावी अशी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मागणी करत या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुनावणी होणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now