Sharad Pawar NCP Chief Resignation: यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान बाहेर उपोषणाला बसलेल्या एनसीपी कार्यकर्त्यांच्या मनधरणीचे सुप्रिया सुळे, अजित पवार यांचे प्रयत्न सुरूच (Watch Video)

वायबी चव्हाण सेंटर वर बोलताना जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड सह अनेकांना अश्रू अनावर झाले.

YB center | Twitter

'लोकं माझे सांगाती' या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आत्मचरित्राची आज सुधारित आवृत्ती प्रकाशनाचा सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये आजोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये बोलताना शरद पवार यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती ची घोषणा केली आणि राज्यासह देशाच्या राजकारणामध्ये आता खळबळ माजली आहे. दरम्यान पवार कुटुंब शरद पवारांच्या निर्णयावर ठाम असताना कार्यकर्ते, नेत्यांच्या पचनी मात्र त्यांचा हा निर्णय पडत नाही आहे. एनसीपी कार्यकर्त्यांनी वायबी चव्हाण सेंटर बाहेर आंदोलन, उपोषण करण्यास सुरूवात केली आहे. मात्र सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याकडून कार्यकर्त्यांची मनधरणी सुरू आहे.

शरद पवार सिल्व्हर ओक या आपल्या निवासस्थानी परतल्यानंतर कार्यकर्ते वायबी चव्हाण बाहेर ठाण मांडून बसले आहेत. सुप्रिया सुळे यांनी ही आपली इमारत नाही. तुम्ही अन्यत्र बसा आणि काहीतरी खाऊन घ्या. तुम्ही अन्नपाणी सोडल्याने यावर तोडगा निघणार नाही. पण आम्ही शरद पवारांशी बोलून योग्य निर्णय करण्याचा प्रयत्न करतो असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी फोन स्पीकर वर टाकून शरद पवार यांच्याकडूनच थेट संदेश कार्यकर्त्यांना ऐकवला. पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याचं दिसून आलं आहे. आता या कार्यकर्त्यांना वायबी सेंटर मधून दूर करण्यासाठी पोलिस हस्तक्षेप करणार का? हे पहावं लागेल.

दरम्यान शरद पवार सिल्व्हर ओक वर जात असताना काहींनी त्यांच्या गाडीसमोर आडवं होऊन त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना दूर केलं. सध्या सिल्व्हर ओक वर पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. Sharad Pawar: शरद पवारांचा राजीनामा मंजूर व्हावा यासाठी अजित पवार उतावीळ, अंजली दमानियांची टीका .

वायबी चव्हाण सेंटर वर बोलताना जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड सह अनेकांना अश्रू अनावर झाले.