कोरोना व्हायरसच्या संदर्भातील कामांचा आढावा घेण्यासाठी शरद पवार 19 जुलैला सोलापूर दौऱ्यावर
परंतु कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा विविध जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनांकडून तेथील कोरोनाची परिस्थिती संदर्भात आढावा घेत असतात.
महाराष्ट्रात कोरोन व्हायरसच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांसह प्रशासन चिंतेत आहे. परंतु कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा विविध जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनांकडून तेथील कोरोनाची परिस्थिती संदर्भात आढावा घेत असतात. याच दरम्यान आता येत्या 19 जुलैला राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. शरद पवार या दौऱ्यानिमित्त कोरोना व्हायरस संदर्भातील कामांचा आढावा घेणार आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी अधिक माहिती दिली आहे.
सोलापूर येथे सध्या कोरोनाचे 3978 रुग्ण आढळून आले असून 344 जणांचा बळी गेला आहे. तर 2076 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली आहे. सोलापूरसह नाशिक, जळगाव, औरंगाबाद येथे सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून पुन्हा लॉकडाऊनचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत.(मुंबईतील धारावीत आज कोरोनाचे नवे 10 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2438 वर पोहचला, महापालिकेची माहिती)
महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत बोलायचे झाल्यास गुरुवारी आलेल्या आकडेवारीनुसार आणखी 8641 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून 266 जणांचा बळी गेला आहे. तर राज्यात सध्या 1,14,648 अॅक्टिव्ह रुग्ण असून एकूण 11,194 जणांचा बळी गेला आहे. तसेच 1,58,140 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. मुंबईत सर्वाधिक म्हणजेच 97,950 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.