Jitendra Awhad Arrested: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हड यांना ठाणे पोलिसांकडून अटक

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad Arrested) यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. 'हर हर महादेव' (Har Har Mahadev Movie) चित्रपटास विरोध नोंदवताना चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण झाल्याचे हे प्रकरण आहे. स्वत: जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.

Jitendra Awhad | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad Arrested) यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. 'हर हर महादेव' (Har Har Mahadev Movie) चित्रपटास विरोध नोंदवताना चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण झाल्याचे हे प्रकरण आहे. स्वत: जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचा मी शिलेदार आहे. त्याचे विचार आणि इतिहास यांचे रक्षण करताना मला अटक करण्यात आले तर मी त्याला घाबरत नाही. अशा प्रकरमात मी जामीनही घेणार नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हा यांनी माहिती देताना म्हटले की, वर्तकनगर पोलिसांकडून मला फोन आला होता. पोलिसांनी मला सांगितले तुम्हाला नोटीस द्यायची आहे. त्यावर मी त्यांना म्हणालो की, मला मुंबईला जायचे आहे. आता मी ठाण्यात आहे. मी स्वत:च येऊन नोटीस घेऊन जातो. तेव्हा त्यांनी मला पोलीस स्टेशनला बोलावले. मी नोटीस घ्यायला पोलीस स्टेशनमध्ये नेले तर तिथल्या अधिकाऱ्यांनी मला सांगितले की, तुम्हाला अटक करण्याचे आदेश आहेत, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. (हेही वाचा, Har Har Mahadev Controversy: हर हर महादेव सिनेमच्या शो दरम्यान ठाण्यातील सिनेमागृहात मोठा राडा, प्रेक्षक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची)

ठाण्यातील विवियाना मॉल येथील चित्रपटगृहात 'हर हर महादेव' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखवल्याचा जितेंद्र आव्हाड आणि समर्थकांचा दावा आहे. यावरुनच त्यांनी आपल्या समर्थकांसह चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, ''हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत तीन ट्विट केली आहेत''.

Jitendra Awhad Tweet

जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात केलेल्या दुसऱ्या ट्वटमध्ये म्हटले आहे की, ''मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल''.

तिसऱ्या ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हटले आहे की, ''आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो''.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now