राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रॅपच्या माध्यमातून भाजप सरकारवर टिका; बेरोजगारी, महागाई, शेती संदर्भात प्रश्न निर्माण, पाहा संपूर्ण व्हिडिओ
या निवडुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (National Congress Party) सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ शेअर केला आहे. राष्ट्रवादीने या व्हिडिच्या माध्यमातून भाजपच्या सरकारवर (BJP) जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा २०१९ (Maharastra Assembly Election 2019) येत्या २१ ऑक्टोबर रोजी पार पडणार असून सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. या निवडुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (National Congress Party) सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ शेअर केला आहे. राष्ट्रवादीने या व्हिडिच्या माध्यमातून भाजपच्या सरकारवर (BJP) जोरदार टीका केली आहे. भाजप केवळ विकासाच्या नावाखाली राज्य करत आहेत, परंतु, महाराष्ट्रातील तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे, याकडे भाजप दुर्लक्ष करत आहे, असेही सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करुन राष्ट्रवादीने तरुणांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नुकतेच राष्ट्रवादी पक्षाने ट्विटरवर रॅप करणाऱ्या मुलांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. भाजपच्या सरकारने महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली आहे. हे सरकार केवळ अश्वासन देण्याचे काम करत आहे, असा आरोप व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे. भाजप सरकार विकासाच्या नावाखाली राज्य करत आहेत. तसेच भाजप सत्तेत आल्यापासून महागाई वाढली आहे. शेतकरी कर्जात बुडला आहे. हे असेच घडत आले आहे आणि यापुढेही असेच घडणार, असा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे. हे देखील वाचा- पुणे: विधानसभा निवडणूक प्रचारात मनसेची कोंडी; राज ठाकरे यांच्या सभेसाठी मिळेनात मैदाने
राष्ट्रवादीचे ट्विट-
विधानसभा निवडणुक तोंडावर आली असून कोणताही पक्ष विरोधकांवर टिका करण्याची संधी सोडत नाही. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपवर निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणूक येत्या २१ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी लागणार आहे.