NCP Core Team Meeting: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर टीमची बैठक; धनंजय मुंडे प्रकरणावर काय निर्णय होणार?
या आरोपांबाबत धनंजय मुंडे यांनी आपल्याकडे त्यांची पूर्ण बाजू मांडली आहे. धनंजय मुंडे यांचे म्हणने पक्षातील सहकाऱ्यांना सांगणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे लवकरच सर्व सहकाऱ्यांशी चर्चा केली जाईल असे शरद पवार यांनी म्हटले होते.
Dhananjay Munde Allegation Case Updates: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर झालेले आरोप. त्यावर धनंजय मुंडे यांनी केलेला खुलासा आणि राज्यात तापलेले राजकारण या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक (NCP Core Team Meeting) पार पडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या घरी पार पडत असलेल्या या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित असल्याचे समजते. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर असलेले आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. या आरोपांबाबत धनंजय मुंडे यांनी आपल्याकडे त्यांची पूर्ण बाजू मांडली आहे. धनंजय मुंडे यांचे म्हणने पक्षातील सहकाऱ्यांना सांगणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे लवकरच सर्व सहकाऱ्यांशी चर्चा केली जाईल असे शरद पवार यांनी म्हटले होते.
दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. परंतू त्यांची शहानिशा व्हायला हवी. पूर्ण सत्य पुढे येत नाही तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षाप्रत येणे अथवा त्यांच्या राजीनाम्याबाबत बोलणे योग्य ठरणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Dhananjay Munde Allegation Case: सावध झालो नसतो तर माझाही धनंजय मुंडे झाला असता, मनसे नेते मनिष धुरी यांचा गौप्यस्फोट; 'त्या' महिलेवर ब्लॅकमेलिंगचा आरोप)
दरम्यान, भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी या प्रकरणात एक गौप्यस्फोट केला आहे. धनंजय मुंडे यांना टार्गेट करणाऱ्या या महिलेने आपल्यालाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. 2010 पासून ही महिला वारंवार आपल्याला संपर्क साधून संबंध ठेवण्याबाबत बोलत होती. परंतू, आपण तिच्याकडे लक्ष दिले नाही, असे भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी म्हटले आहे.
भाजप नेते कृष्णा हेगडे यांच्याप्रमाणेच मनसे नेते मनीष धुरी यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणारी महिला आपल्यालाही ब्लॅकमेल करत होती असे म्हटले आहे. संबंधित महिलेने आपला नंबर मिळवून आपल्याशी संपर्क केला. त्यानंतर तिने संपर्क वाढवत आपल्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. एकदा तर आपल्या बहिणीला भेटायचे आहे असे सांगून ही महिला मला खोलीवर घेऊन गेली होती असेही धुरी म्हणाले. तसेच, आपण वेळीच सावध झालो अन्यता 2010 च्या आसपासच आपला धनंजय मुंडे झाला असता असेही धुरी यांनी सांगितले.