'भाजपकडून मला बदनाम करण्याचा प्रयत्न' व्हायरल व्हिडिओवर नवाब मलिक यांचे स्पष्टीकरण
एमआयएमचे नेते वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा राजकीय वर्तुळातून तीव्र शब्दांत निषेध केला जात असताना राष्ट्रवादी नेते आणि महाविकास आघाडीचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
एमआयएमचे नेते वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा राजकीय वर्तुळातून तीव्र शब्दांत निषेध केला जात असताना राष्ट्रवादी नेते आणि महाविकास आघाडीचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार अवधुत तटकरे, विद्या चव्हाण आणि माजी मंत्री फौजिया खान यांच्यासह नवाब मलिकही रायगड किल्यावर उपस्थित होते. दरम्यान सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना नवाब मलिक गप्प उभे असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. या व्हिडिओसंदर्भात नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली नोंदवली आहे. तसेच भाजपकडून मला बदनाम केले जात आहे, असे आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
सध्या नवाब मलिक यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. तसेच रायगड किल्लावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना नवाब मलिक गप्प का होते, असेही प्रश्न उपस्थिक केले जात आहेत. यावर नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण देत म्हणाले की, भाजपकडून मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ हा तब्बल 2 वर्षापूर्वीचा आहे. भाजपच्या लोकांनी हा व्हिडिओ त्यांच्या ग्रुपवर टाकून व्हायरल केला आहे. तसेच भाजपच्या लोकांना माझी इतकी भिती का वाटते? असा प्रश्नही नवाब मलिक यांनी त्यावेळी विचारला आहे, असेही नवाब मलिक म्हणाले आहेत. हे देखील वाचा- वाघ आहे का बेडूक? मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून शिवसेनेवर बोचरी टीका
नवाब मलिक यांचे ट्वीट-
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते राम कदम यांनी देखील नवाब मलिक आणि राष्ट्रवादी पक्षावर शाब्दिक निशाणा साधला आहे. याबाबत ट्विट करत कदम म्हणतात, पहा नवाब मलिक घोषणा देत आहे का ? आणि देत नाहीत तर का? याचे उत्तर महाराष्ट्राला राष्ट्रवादी पक्षाने का देऊ नये? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, या व्हिडिओमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना तर असा माणूस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष पदावर राहणे योग्य आहे का? असा सवाल मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी विचारला आहे.