Nawab Malik News: साहेब की दादा? नवाब मलिक यांची भूमिका स्पष्ट झाल्याची चर्चा; सभागृहात सत्ताधारी बाजूचे आसन ग्रहण
मात्र, तुरुंगात असल्याने नवाब मलिक (Nawab Malik) याला अपवाद आहेत. ते नेमके कोणाच्या बाजूने याबाबत अद्यापही निश्चितता नव्हती.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात निर्माण झालेला 'शिवसेना' टाईप पेच अनेक आमदार खासदारांपुढे अडचणी निर्माण करतो आहे. अर्थात हा पेच निर्माण होऊन बराच काळ झाल्याने आता आमदार देखील अजित पवार (Ajit Pawar) की शरद पवार (Sharad Pawar) या निर्णयाप्रद आले आहेत. मात्र, तुरुंगात असल्याने नवाब मलिक (Nawab Malik) याला अपवाद आहेत. ते नेमके कोणाच्या बाजूने याबाबत अद्यापही निश्चितता नव्हती. त्यातच न्यायालयाने त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई केल्याने हे गूढ आणखी वाढले होते. मात्र, राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज नागपूर येथे सुरु झाले. या अधिवेशनादरम्यान याबाबत निश्चित नसली तरी काहीशी स्पष्टता आली आहे.
नवाब मलिक सत्ताधारी बाजूला सर्वात शेवटच्या बाकावर
राज्य विधिमंडळाचे कामकाज सुरु होताच सर्व आमदार सभागृहात जमतात. सत्ताधारी आणि विरोधी आमदारांची सभागृहातील आसनव्यवस्था वेगवेगळी असते. त्यामुळे न्यायालयीन आदेशानुसार मौनात गेलेले नवाब मलिक कोणत्या बाजूचे आसन ग्रहन करतात याबातब उत्सुकता होती. प्रसारमाध्यमांच्याही नजरा त्यांच्याकडे वळल्या होत्या. दरम्यान, मलिक हे सभागृहामध्ये सत्ताधारी बाजूला सर्वात शेवटच्या बाकावर जाऊन बसले आहेत. (हेही वाचा, Maharashtra Assembly Winter Session 2023: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरुवात)
'साहेब की दादा' अद्यापही मौन
नवाब मलिक हे सत्ताधारी आमदारांच्या शेवटच्या रांगेत बसल्याने त्याचे विविध अर्थ काढले जात आहेत. आतापर्यंत नवाब मलिक तटस्त असल्याचे सांगितले जात होते. मात्र, ते आता ज्या बाजूला बसले आहेत ते पाहता त्यांचा कल अजित पवार गटाकडे असल्याचे बोलले जात आहे. अर्थात आज आधिवेशनाचा पहिला दिवस आहे. त्यामुळे त्यातून नेमका अर्थ लावणे कठीन आहे. उद्या जर नवाब मलिक विरोधी पक्षाच्या बाजूला बसले तरीही त्यावरुन उलटसुलट चर्चा सुरुच राहणार आहेत. त्यामुळे 'साहेब की दादा' याबातब नवाब मलिक यांनी अद्याप तरी कोणती भूमिका घेतली आहे, हे स्पष्ट झाले नाही. (हेही वाचा, Nawab Malik Interim Bail Extends: आमदार नवाब मलिक यांच्य अंतरिम जामिनमध्ये सुप्रिम कोर्टाकडून तीन महिन्यांची मुदतवाढ)
नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आक्रमक चेहरा मानले जात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडण्याआधी ते राष्ट्रवादीची बाजू प्रसारमाध्यमांसमोर परखडपणे मांडत असत. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेशतपासे होते मात्र असे असले तरी, नवाब मलिक हेच पक्षाची अधिकृत भूमिका मांडत असत. खासकरुन आर्यन खान प्रकरणात त्यांनी एनसीबीविरोधात घेतलेल्या पत्रकार परिषदा विशेष गाजल्या होत्या. त्यातून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे अधिक अडचणीत येत गेले. दरम्यान, पुढे एका प्रकरणात मलिक यांना अटक झाली. प्रदीर्घ काळ तुरुंगात राहिल्यानंतर त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर झाला आणि ते तुरुंगा बाहेर आले.