Nawab Malik-Nitesh Rane यांच्यामध्ये फोटो मॉर्फ करत ट्वीटरवॉर
नवाब मलिक यांनी कोबंडी तर नितेश राणे यांनी डुक्काराचा मॉर्फ फोटो पोस्ट करत नवा वाद छेडला आहे.
मुंबई मध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये (Maharashtra Winter Session 2021) विरोधी पक्ष भाजपाचं विधिमंडळ परिसरात आंदोलन असताना नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आदित्य ठाकरे जात असताना 'म्याव-म्याव' आवाज काढत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरेंकडून (Aaditya Thackeray) त्यावर प्रतिक्रिया आलेली नसली तरी महाविकास आघाडी मधील एनसीपी नेते नवाब मलिकांनी (Nawab Malik) वादात उडी मारत तो अधिक पेटवला आहे.
काल (24 डिसेंबर) नवाब मलिक यांनी कोंबडीचा फोटो ट्वीट करत पेहचान कौन? असं ट्वीट केले होते. आज भाजपा नेते नितेश राणे यांनी डुक्काराचा फोटो ट्वीट करत 'ही प्रजाती फक्त भंगारात आढळते.. ओळखा पाहू कोण?' असं ट्वीट करत नवं ट्वीटरवॉर छेडलं आहे. (हेही वाचा, Maharashtra Winter Session 2021: नितेश राणे यांचे ‘म्याऊ… म्याऊ’; विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपची घोषणाबाजी).
नवाब मलिक ट्वीट
नितेश राणे ट्वीट
नितेश राणे यांनी विधिमंडळ परिसरात 'म्याव..' म्हटल्याच्या कृतीचं समर्थन करताना शिवसेना पक्ष पूर्वी वाघ होता आता तो मांजर झाला आहे. त्यामुळे मी जे केले त्यामध्ये काहीही गैर नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवसेनेही यावर तिखट प्रतिक्रिया देत विधान भवनात आचारसंहिता लागू करण्याची मागणी केली आहे. तर भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचीही मानहानी होणार नाही याची सर्वांनीच खबरदारी घेतली पाहिजे असं म्हणत नितेश राणेंनाच सुनावले आहे.