नवाब मलिक यांना बॉम्बे हायकोर्टाचा झटका, वानखेडे परिवाराच्या विरोधातील विधानांवर लावला लगाम
बनावट सर्टिफिकेटमुळे नोकरी मिळवल्याच्या आरोपामुळे चर्चेत आलेले एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यासह परिवाराला बॉम्बे हायकोर्टाने दिलासा दिला आहे.
बनावट सर्टिफिकेटमुळे नोकरी मिळवल्याच्या आरोपामुळे चर्चेत आलेले एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यासह परिवाराला बॉम्बे हायकोर्टाने दिलासा दिला आहे. खरंतर कोर्टाने वानखेडे यांच्या वडिलांच्या याचिकेवर सुनावणी केली. त्यानुसार नवाब मलिक (Nawab Malik) आणि त्यांच्या परिवाराला निर्देशन दिले की, त्यांनी वानखेडे यांच्या परिवाराच्या विरोधात सोशल मीडियात काही शेअर करु नये. आदेशात स्पष्ट सांगण्यात आले आहे की, वानखेडेंच्या विरोधात कोणतेही विधाने सुद्धा करु नये.
खरंतर समीर वानखेडे आणि त्यांच्या परिवारावर नवाब मलिक यांच्याद्वारे सातत्याने आरोप केले जात होते. त्यामुळेच समीर यांच्या वडिलांनी बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आता कोर्टाने सुनावणी करत नवाब मलिक यांना झटका दिला आहे. त्याचसोबत मलिक यांना वानखेडे यांच्या विरोधात कोणताही विधाने करता येणार नाही आहेत.(Dnyandev Wankhede Defamation Case: मुंबई उच्च न्यायालयाने ज्ञानदेव वानखेडे बदनामी प्रकरणाची सुनावणी 9 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली)
दरम्यान, ज्ञानदेव वानखेडे यांनी उच्च न्यायालयात सुरुवातीला नबाव मलिक यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यामध्ये त्यांच्यापरिवाराच्या विरोधत सोशल मीडियात अपमानजनक पोस्ट केल्याचे म्हटले होते. तसेच ज्ञानदेव वानखेडे यांनी 1.25 कोटी रुपयांची नुकसान भरपाई सुद्धा द्यावी अशी मागणी केली होती. यापूर्वी 22 नोव्हेंबरला कोर्टाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली होती. वानखेडे यांच्या याचिकेवर कोर्टाने म्हटले होते की, डिफिडेंट यांना राइट टू स्पीच चा अधिकार आहे.