Nawab Malik यांचा Sameer Wankhede यांच्याबाबत अजून एक गौप्यस्फोट; ट्वीट केले जातप्रमाणपत्र
समीर दाऊद वानखेडे यांच्या वर टीका करताना 'यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा' असं म्हणत त्यांनी अजून एक ट्वीट करत समीर दाऊद वानखेडे यांचे जातप्रमाणपत्र शेअर करुन फर्जीवाडयाची पोलखोल केली आहे.
महाराष्ट्रामध्ये मागील काही महिन्यापासून आर्यन खान प्रकरण याची चर्चा सुरू आहे. यामध्ये दिवसागणिक नवनवे ट्वीस्ट समोर आले आहेत. 'पहचान कौन' असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे अधिकारी समीर दाऊद वानखेडे (Sameer Wankhede) यांचा लग्नातील फोटो ट्वीटरवर शेअर करुन आणखी खळबळ उडवून दिली आहे. अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्याशी विवाहबंधनात अडकण्याआधी समीर वानखेडे यांचा डॉ शबाना कुरेशी (Shabana Qureshi) यांच्याशी विवाह झाल्याचा दावा केला जात आहे. नक्की वाचा: Nawab Malik on Sameer Wankhede: समीर वानखेडे यांना वर्षभरात तुरुंगात टाकणार; नवाब मलिक यांचे जाहीर वक्तव्य.
समीर दाऊद वानखेडे यांच्या वर टीका करताना 'यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा' असं म्हणत त्यांनी अजून एक ट्वीट करत समीर दाऊद वानखेडे यांचे जातप्रमाणपत्र शेअर करुन फर्जीवाडयाची पोलखोल केली आहे. ट्वीटरच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे याने फर्जीवाडा करुन नोकरी कशी मिळवली आहे हे जातप्रमाणपत्र शेअर करत आणखी एक पोलखोल केली आहे. अजून काही पुरावे नवाब मलिक समोर आणणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
नवाब मलिक ट्वीट
Pehchan kaon? pic.twitter.com/S3BOL4Luc8
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 25, 2021
Sameer Dawood Wankhede का यहां से शुरू हुआ फर्जीवाड़ा pic.twitter.com/rjdOkPs4T6
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 25, 2021
एनसीबीच्या बोगस कारवाईवर आणि आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या समीर दाऊद वानखेडे याच्या मनसुब्यावर नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अनेक पुरावे सादर करत नवाब मलिक यांनी आर्यन खान अंमली पदार्थ कारवाई कशी बोगस आहे आणि आघाडी सरकारला कसं बदनाम केलं आहे हे पत्रकार परिषद घेत समोर आणले होते.
(The above story first appeared on LatestLY on Oct 25, 2021 12:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

