Coronavirus: 'नवरी नटली' फेम लोककलावंत छगन चौगुले यांचे निधन; कोरोना व्हायरस चाचणी आली होती पॉझिटीव्ह
छगन चौगुले यांना विशेष ओळख मिळवून दिली ती 'खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली काल बाई सुपारी फुटली' या गाण्याने. आजही अनेक टीव्ही शो, शाळा महाविद्यालयांचे युवा महोत्सव आणि विविध कार्यक्रमात 'नवरी नटली' हे गाणे वाजवले जाते.
'नवरी नटली' (Navri Natali) फेम लोककलावंत (Folk Artist) छगन चौगुले (Chhagan Chougule) यांचे निधन झाले आहे. त्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. मुंबई येथील सेव्हन हिल्स रुग्णालात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छगन चौगुले (Folk Artist Chhagan Chougule) यांनी 'कथा चांगुणाची', 'कथा श्रावण बाळाची', 'आईचे काळीज', 'अंबाबाई कथा : कथा तुळजापुरची भवानी', 'कथा देवतारी बाळूमामा' यांसारखे कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाच्या ध्ननिमुद्रीका विशेष गाजल्या. मात्र, छगन चौगुले यांना विशेष ओळख मिळवून दिली ती 'खंडेरायाच्या बानू लग्नाला नवरी नटली काल बाई सुपारी फुटली' या गाण्याने. आजही अनेक टीव्ही शो, शाळा महाविद्यालयांचे युवा महोत्सव आणि विविध कार्यक्रमात 'नवरी नटली' हे गाणे वाजवले जाते.
मुंबई विद्यापीठाचे लोककला विभागाचे प्रमुख गणेश चंदनशिवे यांनी एका वृत्तवाहिणीशी बलताना सांगितले की, छगन चौगुले हे हाडाचे लोककलावंत होते. त्यांनी लोककलेचे विशेष असे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते. तरीही त्यांची कला सादर करण्याची कौशल्य अफलातून होते. मुळातले ते जागरण गोंधळी होते. त्यामुळे त्यांची सुरुवात हे जारण गोंधळाच्या कार्यक्रमातून झाली. परंतू, केवळ जागरण गोंधळाचे कार्यक्रम न करता त्यांनी स्वत:तील कलेला व्याप्त स्वरुप दिले. ज्यामुळे महाराष्ट्राला एक नवा लोककलावंत मिळाला. (हेही वाचा, जेष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचे निधन; कोव्हिड 19 चाचणी आली होती पॉझिटीव्ह)
लोककलावंत छगन चौगुले यांच्या आवाजात 'नवरी नटली' (व्हिडिओ)
Chhagan Chougule Passes Away: 'नवरी नटली' फेम आणि लोककलावंत छगन चौगुले यांच निधन - Watch Video
संगित ऐकण्यासाठी आज सीडी, पेन ड्राईव्ह, मोबाईल आणि संगणक आदी साधने उपलब्ध आहेत. इंटरनेटने आणि त्यावरील विविध संकेतस्थळांनी तर या साधनांचीही मक्तेदारी मोडीत काढत संगितप्रेमिंसाठी नवे दालन उभे केले. मात्र, एक काळ होता गायक आणि संगितकारांच्या आवाजात ध्वनिमुद्रीत केलेल्या ध्वनिमुद्रिका काढल्या जात. या ध्वनिमुद्रिकांनी महाराष्ट्रातील अनेक कलावंतांना ओळख मिळवून दिली. यात सुरुवातीला विठ्ठल उमप, शाहीर साबळे, शाहीर प्रल्हाद शिंदे याचा समावेश होता. पुढे याच यादीत आनंद शिंदे, मिलिंद शिंदे आणि छगन चौगुले यांचा समावेश झाला. छगन चौगुले यांनी अनेकांच्या कुलदेवतांची गाणी आणि लोकगिते गायली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)