Navratri Gold- Silver Price Today: नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात कसा आहे सोने चांदी दर? जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांतील प्रति तोळा किंमत
कालच्या दरात आजही फारसा फरक पडला नाही. अर्थात हे दर 22 कॅरेट सोन्याचे आहेत. तर चांदी प्रति किलो 55000.00 रुपये दराने विकली जात आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर खालील प्रमाणे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या किमती बदलल्या आहेत. दोन्ही मौल्यवान धातूचे मुल्य देशांतर्गत बाजारात घसल्याचे पाहायला मिळते आहे. गुड रिटर्न्स वेबसाईट सोने, चांदी दराबाबत माहिती देत असते. या माहितीनुसार, नवरात्रोत्सवादरम्यान (Navratri Gold- Silver Price Today) भारतात सोन्याचे भाव प्रति तोळा म्हणजेच प्रति 10 ग्रॅम 10 ग्राम 45,950 रुपये इतक्या दराने विकले जात आहे. कालच्या दरात आजही फारसा फरक पडला नाही. अर्थात हे दर 22 कॅरेट सोन्याचे आहेत. तर चांदी प्रति किलो 55000.00 रुपये दराने विकली जात आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर खालील प्रमाणे.
मुंबई
22 कॅरेट सोने- 45,800 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24- कॅरेट सोने- 49,970 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
पुणे
22 कॅरेट सोने- 45,830 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24- कॅरेट सोने- 50,000 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
नागपूर
22 कॅरेट सोने- 45,830 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24- कॅरेट सोने- 50,000 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
नाशिक
22 कॅरेट सोने- 45,830 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24- कॅरेट सोने- 50,000 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
(टीप- वरील सर्व दर गुड रिटर्न्स बेवसाईटवर दिलेल्या माहितीनुसार)
वर देण्यात आलेले सोने, चांदी दर हे केवळ सूचक आहेत. त्यात GST, TST यांसारख्या दरांचा समावेश नाही. सोने, चांदी यांचे मूळ दर वेगळे असतात. त्यात उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क लागल्याने राज्य आणि प्रांतवार या दरांमध्ये तफावत आढळते. विविध राज्यांमध्ये उत्पादन शुल्क वेगवेगळे असल्याने राज्यनिहाय सोने, चांदी दरात फरक असू शकतो. कधी हा फरक अधिक असतो कधी कमी. त्यातच जर तुम्ही सोने, चांदी दागिणे खरेदी करत असाल तर त्यावर घडणावळ म्हणजे मेकींग चार्जेसही लागतात. त्यामुळे अचूक दरांसाठी आपण आपल्या स्थानिक सोनार अथवा ज्वेलर्सशी संपर्क साधू शकता. (हेही वाचा, Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी Bitcoin, Ethereum खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी घ्या जाणून)
दागिने बनविण्यासाठी प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्याचाच वापर होतो. यात काही लोक 18 कॅरेट सोन्याचाही उपयोग करतात. सोने दागिने कॅरेट अनुसार हॉल मार्कचे बनतात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिण्यांवर 999 असा शिक्का असतो. 23 कॅरेट दागिन्यावर 958, 22 कॅरेट दागिन्यावर 916, 21 कॅरेट वर 875 आणि 18 कॅरेट वर 750 लिहीलेले असते. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन नुसार आपण केवळ एक मिस्ड कॉल देऊनही सोने, चांदी दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपणास 8955664433 या क्रमांकावर एक मिसकॉल द्यावा लागेल.ज्या फोन नंबरवरुन आपण मिस कॉल द्याल त्याच क्रमांकावर आपल्याला हे दर उपलब्ध होऊ शकतील.