नवी मुंबई: ई-पाससाठी बनावट आधार कार्ड वापरणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक

गेल्या काही दिवसात ई-पास मिळवण्यासाठी आणि तयार करण्यासाठी नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. याच दरम्यान आता पोलिसांकडून ई-पाससाठी खोटे आधार कार्डचा वापर करणाऱ्या नवी मुंबईतील (Navi Mumbai) दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे

प्रातिनिधिक प्रतिमा | (File photo)

राज्यात कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासह काही गोष्टी सुरु सरकारने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याचसोबत राज्याअंतर्गत प्रवासासाठी सराकरने ई-पास अत्यावश्यक असल्याची सुचना सुद्धा नागरिकांना दिली आहे. मात्र गेल्या काही दिवसात ई-पास मिळवण्यासाठी आणि तयार करण्यासाठी नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. याच दरम्यान आता पोलिसांकडून ई-पाससाठी खोटे आधार कार्डचा वापर करणाऱ्या नवी मुंबईतील (Navi Mumbai) दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.(Ganeshotsav E-Pass: गणेशोत्सवासाठी खासगी वाहनांना लागणारे ई-पास आता सहज उपलब्ध होणार; असा करा अर्ज)

नवनाथ दाभाडे आणि ईश्वर सिंग असे आरोपींचे नाव आहे. या दोघांनी ई-पास मिळवण्यासाठी बनावट आधार कार्डची कॉपी पोलिसांच्या संकेतस्थळावर अपलोड केली. मात्र ज्यावेळी वेरिफिकेशन करण्यात आले तेव्हा आधार कार्डवरील पुढील क्रमांक हा पाठी असलेल्या क्रमांकापेक्षा वेगळा होता. या प्रकरणी अधिक तपास केला असता या दोघांनी बनावट आधार कार्ड हे प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या ई-पाससाठी वापरल्याचे समोर आले.(Lockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज?)

 दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी ट्विटच्या माध्यमातून जनतेला सतर्क केले आहे. यात त्यांनी बनावट ई-पास रॅकेटला बळी पडू नका, असे आवाहन मुंबईकरांना केले आहे. ई-पास मिळवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. तेथे तुमची सर्व माहिती भरुन आवश्यक ती कागदपत्रे जोडून सब्मिट करा. त्यानंतर तुमच्या माहितीची पडताळणी करुन तुम्हाला ई-पास देण्यात येईल.कोविड-19 लॉकडाऊनमुळे राज्याच्या विविध ठिकाणी अडलेले नागरिक मूळ ठिकाणी परतण्यासाठी धडपडत आहेत. अशा परिस्थिती ई-पास मिळवण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध नसल्यास चुकीच्या किंवा अनधिकृत व्यक्ती किंवा संस्थेकडून ई-पास मिळवला जातो. परंतु, नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी हे सतर्कतेचे आवाहन केले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now