Vashi Suicide News: कोपरी गावात अल्पवयीन मुलीने संपवलं जीवन, आत्महत्येच कारण अस्पष्ट, परिसरात खळबळ

पोलिस या घटनेचा तपास करत आहे.

Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Vashi Suicide News: वाशीतील (Vashi) कोपरी गावात एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महतेच कारण अस्पष्ट आहे. तीनं टोकाचं पाऊल का उचलले असा प्रश्न परिसरातील नागरिकांच्या उभा राहिला आहे. राहत्या घरी त्यानी गळफास घेतला. कुटूंबातील सदस्य घरी परतले तेव्हा त्यांना मुलगी लटकलेल्या अवस्थेत दिसली. तीला रुग्णालयात नेलं आणि डॉक्टरांनी तीला मृत घोषित केल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय तरुणीने बुधवारी रात्री घरी कोणी नसताना आत्महत्या केली. तिने पंख्याला कपड्याने गळफास लावून घेतला. राधिका बेलोसे असे तिचे नाव असून ती कोपरी गावात कुटुंबासह राहत होती. मुलगी लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

पोलीसांना या घटनेची माहिती देण्यात आली. एपीएमसी पोलीस या घटने अंतर्गत  अधिक तपास  करत आहेत.परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.