नवी मुंबई: नेरुळ येथील डी वाय पाटील स्टेडीयम जवळ आग लागल्याचे वृत्त
ही आग नेमकी कोणत्या इमारतीस लागली आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. तसेच, आगीचे कारनही स्पष्ट होऊ शकले नाही. आगीचे प्रमाण किती आहे याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.
Fire Breaks In Navi Mumbai: नवी मुंबई (Navi Mumbai) येथील नेरुळ परिसरात असलेल्या डी वाय पाटील स्टेडीयम (DY Patil Stadium) नजिक आग लागल्याचे वृत्त आहे. आगीची घटना आणि माहिती सोशल मीडियावर देताना काही युजर्सनी ही आग डी वाय पाटील स्टेडीयम (DY Patil Stadium in Nerul) जवळ असलेल्या वसतीगृहास लागल्याचे म्हटले आहे. काही युजर्सनी आगीचे मोबाईलद्वारे चित्रिकरण करुन त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
दरम्यान, ही आग नेमकी कोणत्या इमारतीस लागली आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. तसेच, आगीचे कारनही स्पष्ट होऊ शकले नाही. आगीचे प्रमाण किती आहे याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.
ट्विट
नवी मुंबईत डी. वाय पाटील गर्ल्स हॉस्टेलला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी. pic.twitter.com/37cjTwCUKC
— महाविकास आघाडी (@MHVaghadi) March 18, 2020
ट्विट
#Fire #Fire Broke out in Dy.Patil Hostel bldg in Nerul.#Navimumbai #Fire #Dy_patil pic.twitter.com/445Ic2K3Gs
— Mumbai Tak (@mumbaitak) March 18, 2020
ट्विट
Fire burst out at DY Patil, Nerul Navi Mumbai. #fire @zee24taasnews @abpmajhatv @TV9Marathi @ABPNews @ANI pic.twitter.com/aMeTJS4cCa
— Deepak Kapure (@kapuredeepak) March 18, 2020
एका युजरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओत ही आग दिसते आहे. युजरने हा व्हिडिओ रस्त्यावरुन धावत्या वाहनात असताना चित्रित केल्याचे दिसते. ज्यामुळे आगीचे नेमके प्रमाण किती आहे हे स्पष्ट होत नाही. मात्र, आग लागल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळते
(The above story first appeared on LatestLY on Mar 18, 2020 02:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

