CIDCO Lottery 2019 Last Date: सिडको घरांच्या लॉटरीचे अर्ज भरण्यासाठी फक्त 4 दिवस शिल्लक
Home | (Photo Credits-mhada)

CIDCO Lottery 2019 Last Date of Application: सिडको कडून प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आलेल्या घरांच्या सोडतीच्या रजिस्ट्रेशनला सरकार कडून मुदतवाढ करण्यात आली आहे. तर 4 नोव्हेंबर ही अर्जाची शेवटची तारिख ठरण्यात आली असून रात्री 12 पर्यंतची वेळ देऊ केली आहे. सिडकोच्या घरांच्या लॉटरीचे निकाल 26 नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार आहे. नवी मुंबई मध्ये 11 सप्टेंबर 2019 पासून सिडकोच्या 9249 घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवी मुंबईत 2.10 लाख घर उपलब्ध करुन दिली आहेत. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीच्या कारणामुळे लॉटरीसाठी अर्जाची तारिख आणि निकालासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.

नवी मुंबईमध्ये पावणे, तुर्भे, बोनसरी, शिरवणे आणि कुकशेत या एमआयडीसी भागांमध्ये सिडको आता नवी घरं बांधणार आहेत. सध्या सिडकोने दिलेल्या जाहिरातीतील 1 लाख 10 हजार घरांपैकी 62,976 घरं आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील लोकांसाठी तर 47,040 घरं अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. नवी मुंबईतील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील प्रत्येकाला हक्काचं घर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानुसार, 31 मार्च 2022 पर्यंत देशात 20 मिलियन घरं सामान्यांना परवडतील अशा दरात उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.(CIDCO Lottery 2019 Registration: नवी मुंबई मध्ये 'सिडको' च्या 9249 घरांसाठी lottery.cidcoindia.com वर अर्ज उपलब्ध)

नवी मुंबईमधील या सोडतीमधील घरांच्या किंमती 18 ते 28 लाख आहेत. सिडको गृहनिर्माण योजना बुकलेट येथे पहा आणि या सिडको लॉटरीच्या घरांचा नकाशा, विभागानुसार घरांच्या किंमती, घरांचे लोकेशन आणि पेमेंट बाबतचे अधिक तपशील पाहू शकता. सिडकोकडून ही घरं रेल्वे स्टेशन बाहेरील भूखंड, ट्रॅक टर्मिनल आणि इतर ठिकाणी बांधण्यात येणार आहेत. सिडकोची ही योजना अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी मोठी योजना असल्याचे सांगितलं जात आहे.