Panvel Shocker: पाण्याचा बादलीत पडून १० वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू, पनवेल येथील घटना
नवी मुंबई येथील टाऊनशिपमध्ये राहत्या घरी पाण्याने भरलेल्या बादलीत पडून एका 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
Panvel Shocker: नवी मुंबई (Navi Mumbai) येथील पनवेल टाऊनशिपमध्ये राहत्या घरी पाण्याने भरलेल्या बादलीत पडून एका 10 वर्षीय मुलाचा मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. पनवेल परिसरातील पळस्पे गावात असलेल्या घरातील पाण्याने भरलेल्या बादलीजवळ मुलगा खेळत असताना शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पनवेल पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार घरात मुलगा खेळत असताना तोल गेला आणि थेट पाण्याच्या बादलीत पडला. त्याच्या जीव गुदमरायला लागला. दरम्यान त्याचा मृत्यू झाला अशी माहिती पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने माध्यमांना दिली. पालकांनी मुलाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह शासकिय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला त्यानंतर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.
या घटनेची माहिती इंग्रजी वृत्त पत्राने दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी चौकशी सुरु केली. या घटनेअंतर्गत पोलिसांची परिसरात तपसाणी सुरु झाली आहे. या घटनेनंतर परिसरात शांतता पसरली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 05, 2023 12:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

