Fake Marriage Scam: नवी नवरी म्हणाली 'मधुचंद्र नको गं बाई', नवऱ्याने हिसका दाखवताच झाला भांडाफोड
ओल्या हळदीने वावरणारी ती दोघं. पूर्ण एकांतात. नवरा अधीर.. कधी एकदा पत्नीसोबत मधूचंद्र (Honeymoon ) साजरा करतो असं झालेलं. त्याने रोमँटीक मुडमध्ये येत पत्नीसोबत जवळीक वाढवली. नववधूच ती. लाजणार.. बावरणार.. हे स्वभाविकच होतं. पण झालं उलटंच. नववधूने चक्क हनीमून (Honeymoon Night) साजरा करण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर ती वारंवार त्यासाठी टाळाटाळ करत राहीली.
Nashik Marriage Scam: लग्न झाले. नवी नवरी घरी आली. कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेना. तरुणालाही वाटले आपला संसार सुरु झाला. लग्नाची धामधून संपली आणि हा तरुण पत्नीसोबत हनीमून (Honeymoon ) साजरा करण्याची स्वप्ने पाहू लागला. लवकरच तो क्षणही आला. दोघेही एकांतात. ओल्या हळदीने वावरणारी ती दोघं. पूर्ण एकांतात. नवरा अधीर.. कधी एकदा पत्नीसोबत मधूचंद्र (Honeymoon ) साजरा करतो असं झालेलं. त्याने रोमँटीक मुडमध्ये येत पत्नीसोबत जवळीक वाढवली. नववधूच ती. लाजणार.. बावरणार.. हे स्वभाविकच होतं. पण झालं उलटंच. नववधूने चक्क हनीमून (Honeymoon Night) साजरा करण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर ती वारंवार त्यासाठी टाळाटाळ करत राहीली.
इकडे नवरदेवाचा पारा चढत होता. एवढ्यासाठी केला होता सर्व अट्टाहास आणि आता काहीच लागेना हातास, अशी त्याची अवस्था झाली. त्याने प्रेमाने प्रयत्न करुन पाहिला. पण काही जमले नाही. आता प्रेमाच्या गोष्टी करुनही पत्नी अंगाला हातही लावू देत नाही आणि मधूचंद्राचे नावही काढत नाही. म्हटल्यावर गड्याचा पारा चढला. त्याने थेट आपला खाक्या दाखवला. कधी प्रेमाणे तर कधी आपल्या खास स्टाईलने त्याने उलटतपासणी करण्यास सुरुवात केली. नवरदेवाचा रुद्रावतार पाहून ती नवी नवरी पोपटासारखी बोलू लागली. (हेही वाचा, Love, Sex Aur Dhokha: प्रेमात धोका, नवरदेवाला पोलिसांनी मांडवातून उचलले, लग्नही मोडले; तरुणीच्या तक्रारीनंतर थेट कारवाई)
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील उत्राणे येथे ही घटाना घडली. नववधून असलेल्या त्या मुलीने पतीला सांगितले की, आपला आगोदरच विवाह झाला आहे. आपण केवळ एजंटच्या माध्यमातून इथे आलो आहोत. आपण थोडा दिवस येथे थांबून आपल्याकडेचे दागिणे आणि मिळेल ती रक्कम घेऊन पसार होणार होतो. तरुणीचे बोलणे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने मागचा पुढचा कोणताही विचार न करता थेट पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली. त्याने तरुणीलाही पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे नववधू आणि संशयितांविरुद्ध जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.
त्याचे झाले असे की, नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याती उत्राणे येथील प्रविण मुळे नामक तरुण लग्नासाठी मुलगी पाहात होता. त्यातून त्याचा संबंध एका विवाह जमवून देणाऱ्या टोळीशी आला. या टोळीने त्याचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे अनिता जाधव ऊर्फ पूजा शंकर म्हस्के हिच्याशी लावला. त्यासाठी विविध कारणे देऊन या टोळीने 2 लाख 80 हजार रुपयांची मागणी केली. यापैकी दोन लाख रुपये रोख आणि पन्नास हजार रुपये विजय मुळे यांच्या फोन पे वरून समोरच्या पार्टीला पाठविण्यात आले. त्यानंतर 25 मे 2023 रोजी प्रविण आणि अनिता जाधव ऊर्फ पूजा शंकर म्हस्के यांचा विवाह पार पडला. लग्न झाले मुलगी नांदायलाही आली. मात्र, त्यातून पुढे हा विचित्र प्रकार घडला. सासरच्या मंडळींची फसवणूक झाली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)