Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela Dates: नाशिक, त्र्यंबकेश्वर मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर; पहा शाही स्नान कधी?
त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. गुरु सिंह राशीत प्रवेशाच्या दिवशी, 31ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहणाने या कार्यक्रमाची सुरुवात होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या जिल्हाधिकार्यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर नाशिक मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या पवित्र सोहळ्याची सुरुवात 31 ऑक्टोबर 2026 रोजी त्र्यंबकेश्वर, रामकुंड आणि पंचवटी येथे औपचारिक 'ध्वजारोहण' ने होईल आणि 24 जुलै 2028 रोजी समारोप होईल. नाशिकमध्ये 29 जुलै 2027 रोजी 'नगर प्रदक्षिणा' होणार आहे, त्यानंतर 2 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि 11 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये तीन 'अमृत स्नान' होणार आहेत, तर शेवटचं स्नान 12 सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे.
त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. गुरु सिंह राशीत प्रवेशाच्या दिवशी, 31ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहणाने या कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्र्यंबकेश्वरमधील पहिले दोन अमृत स्नान नाशिकमधील अमृत स्नानांशी जुळतात. 2 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट 2027. त्र्यंबकेश्वर येथील तिसरे अमृत स्नान 12 सप्टेंबर 2027 रोजी होणार आहे.
नाशिक मध्ये झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह सर्व १३ आखाड्यांचे प्रमुख प्रत्येकी दोन साधू - महंत उपस्थित होते. नक्की वाचा: Simhastha Kumbh Mela 2027 in Nashik: 'नाशिक सिंहस्थ कुंभमेळा 2027 ची तयारी पूर्ण झाली'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती.
नाशिकच्या पालकमंत्र्यांचा तिढा कायम
2026 मध्ये नाशिकमध्ये होणार्या कुंभमेळ्याची सरकार दरबारी तयारी सुरू आहे. बैठका सुरू झाल्या आहेत मात्र, नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप कायम आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर बोलताना पालकमंत्री येतात जातात काही अडलंय का? असा सवाल करत या जिल्हात गिरीष महाजन हे कुंभमंत्री मह्णून काम पाहतील म्हणत विषय टाळला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 02, 2025 08:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

