Nashik Suicide Case: तीन तरुणांच्या टवाळखोरीला कंटाळून दहावीतील विद्यार्थिनीने स्वतःला संपवल; नाशिकच्या सिन्नर मधील धक्कादायक घटना

ज्यामध्ये तिने 3 मुलांच्या त्रासाला कंटाळून जीव देत असल्याचं ती म्हणाली आहे.

Suicide | (Photo Credits: unsplash.com)

नाशिकच्या (Nashik)  सिन्नर (Sinner) मध्ये 3 तरूणांच्या टवाळखोरीला कंटाळून एका दहावीतील विद्यार्थीनीने आपलं जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शहा गावातील आहे. पोलिसांनी तिन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मृत मुलीचं नाव वैष्णवी जाधव आहे. 16 वर्षीय वैष्णवीच्या वहीत सुसाईड नोट सापडली आहे.

महिलांच्या छेडछाडीचे अनेक प्रकार समोर येत आहे. कायद्याची भीती नसलेले अनेक रोड रोमियो मुलींना छेडतात. असाच प्रकार वैष्णवीसोबतही घडला. वैष्णवीने मंगळवारी 22 ऑगस्टला रात्री आत्महत्या केली आहे. तिच्या सुसाईड नोट मधील माहिती नुसार आरोपी

वैभव विलास गोराणे, अंकुश शिवाजी धुळसैंदर आणि एक अल्पवयीन मुलगा आहे. या तीन टवाळखोरांमुळे वैष्णवीला टोकाचा निर्णय घ्यावा लागला. या मुलांसोबत वैष्णवीचा वाद झाला होता. तिच्या वडिलांनाही धमकवण्यात आले होते. या ताणतणावातून अखेर वैष्णवीने गळफास घेत आपलं जीवन संपवलं.

वैष्णवीच्या आत्महत्येची गोष्ट सिन्नर सह महाराष्ट्राला सुन्न करणारी आहे. आत्महत्येनंतर पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांना वैष्णवीच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये आरोपींच्या नावाचा उल्लेख आहे. 'माझ्यासह शाळेतील अनेकींना ही मुलं त्रास देत असल्याचं तिनं लिहलं आहे. मी विरोध केला म्हणून माझ्या घरी येऊन वडीलांना माझ्याबद्दल उलटसुलट काही सांगितले गेले. शिव्या देण्यात आल्या, धक्काबुक्की झाली' असं तिने लिहलं आहे. तर पुन्हा काही झाल्यास वडील मारतील या भीतीने आत्महत्या करत असल्याचं वैष्णवीच्या चिठ्ठीत लिहलेलं आहे.