नाशिक: भरधाव वेगाने आलेल्या वाहनाची धडक लागून बिबट्याच्या दोन बछड्यांचा मृत्यू
ही घटना रविवारी रात्री झाल्याचा सांगण्यात येत आहे.
नाशिक (Nashik) मधील सिन्नर (Sinnar) येथे भरधाव वेगाने आलेल्या गाडीने बिबट्याच्या दोन बछड्यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी रात्री झाल्याचा सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डुबेरे-सोनेरी गावाकडे रात्रीच्या वेळेस रस्त्यावरुन बिबट्याची मादी आणि तीन बछडे जात होते. त्यावेळी रस्त्यावरुन जोरात वेगाने आलेल्या गाडीने बछड्यांना धडक दिली. या धडकेत दोन सहा महिन्यांचा बछड्यांचा मृत्यू झाला आहे. परंतु बिबट्याची मादी आणि एक बछडा वाचला असल्याचे सांगण्यात येत आहे.(मुंबई: ठाणे शहरातील फुलपाखरु उद्यानात बिबट्या; मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांची उडाली घाबरगुंडी)
अपघात झाल्यानंतर बिबट्याची मादी आणि बछडा गावातील परिसरात लपून बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवाहन करण्यात आले आहे. तसेच भरधाव वेगाने आलेल्या गाडीचा शोध घेत असून सापडल्यास त्या चालकावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर मृत बछड्यांवर वनउद्यानात अंत्यसंस्कार करण्यात आले.