नाशिक: कामटवाडा परिसरात सिगारेट न दिल्याने गावगुंडांकडून दुकानदारास मारहाण

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातच कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण भारतात संचारबंदी लागू करण्यात आली आहे

Representative Image (Photo Credits: File Photo)

कोरोना विषाणूने संपूर्ण भारतात थैमान घातला आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातच कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण भारतात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, नाशिक (Nashik) येथील कामटवाडा (Kamtawada) परिसरात सिगारेट न दिल्याने गावगुडांनी दुकानदाराला मारहाण केल्याची घटना उघडकीस आले आहेत. ही घटना गुरुवारी मध्यरात्री 3.30 च्या सुमारास घडली. एवढचे नव्हे तर, आरोपींनी दुकानासमोरील पीडिताची रिक्षा आणि दुचाकीचीही तोडफोड केली. तसेच हा वाद मिटवण्यासाठी आलेल्या पडीताच्या भावाला जावे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. यात एका विधीसंघर्षित बालकाससुद्धा समावेश आहे.

नाजीम शाहाबुद्दी खाटीक असे मारहाण झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. नाजीम याचे कामटवाडा परिसरात किराणामालाचे दुकान आहे. गुरुवारी नाजीम हे रात्री 3.30 सुमारास झोपलेले असताना प्रशिक अडंगळे, राहुल शेवाळे याच्यासह एका विधीसंघर्षित बालकाने त्यांचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी प्रशिक, राहुल यांनी नाजीमला सिगारेट मागितली. नाजीम यांनी दरवाजा उघडला असता तिघांनी त्यांच्याकडे सिगारेटची मागणी केली. दुकानातील सिगारेट संपल्या आहेत, तुम्ही दुकानात येवून बघा, असे त्यांनी तिघांना सांगितले. राग अनावर झालेल्या तिघांनी कोयता, लाकडी दांडके घेवून परिसरात दहशत निर्माण करत खाटीक यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्यावर कोयत्याने वार केले. नाजीम यांचे भाऊ मध्यस्थी झाले असता सिगारेट न दिल्याने त्यास सोडणार नाही, त्याला संपल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: दादर मधील शुश्रुषा रुग्णालयात 2 नर्सला कोरोनाची लागण झाल्यानंतर नव्या रुग्णांना प्रवेश नाही-BMC

सध्या राज्यावर कोरोनाचे मोठे संकट वावरत असाताना काही लोक स्वत:हून सरकारच्या मदतीला धावत आहेत. तर जण याचा गैरफायदा घेत नागरिकांवर अत्याचार करत आहेत. सध्या गुन्हेगारांच्या आकड्यात घट झाल्याचे समजत आहेत. मात्र, वरील घटनेने सर्वांचे लक्ष केंद्रीत करून घेतले आहे.



संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

नाशिक: कामटवाडा परिसरात सिगारेट न दिल्याने गावगुंडांकडून दुकानदारास मारहाण

पुण्यात दुचाकी विक्रेत्यांनाच प्रत्येक गाडीसोबत 2 हेल्मेट्स देणं बंधनकारक; अपघात रोखण्यासाठी Pune RTO चे नवे नियम

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गचा अंतिम टप्पा पूर्ण; पुढील महिन्यात उद्घाटन होण्याची शक्यता

Palghar Shocker: प्रसूतीदरम्यान हृदयविकाराच्या झटका आल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू; अर्भकाला वाचवण्यात अपयश, पालघरमधील घटना

Sanjay Raut Praises Devendra Fadnavis: 'गडचिरोलीचा विकास महाराष्ट्रासाठी चांगला'; संजय राऊत यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांची प्रशंसा