Nashik Road Accident: नाशिक मध्ये सप्तश्रृंगी गडावर दर्शनाला येणारी पिकअप गाडी पलटली; 32 भाविक जखमी
देवळापासून 1 किमी अंतरावर अपघातानंतर गाडीमधील भाविकांनी आक्रोश केल्यानंतर गडावरील नागरिक आणि पोलिस घटनास्थळी धावत आले त्यांनी गाडीतील लोकांना बाहेर काढून जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवलं.
नाशिक (Nashik) मध्ये वणी (Vani) येथील सप्तशृंगी गडावरील (Saptashrungi Gad) देवीच्या दर्शनाला येणार्या भाविकांच्या गाडीचा अपघात झाला आहे. पिकअप गाडी पलटी झाल्याने त्यामधील सुमारे 30 जण जखमी झाल्याचं वृत्त समोर आले आहे. जखमींना तातडीने नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार, अपघातातील जखमी हे मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील आहेत. सप्तशृंगीचं मंदिर अवघ्या 1 किलोमीटरच्या अंतरावर असताना हा अपघात झाला आहे. गडावर येत असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ते पलटल्याची माहिती देण्यात आली आहे.
अपघातानंतर गाडीमधील भाविकांनी आक्रोश केल्यानंतर गडावरील नागरिक आणि पोलिस घटनास्थळी धावत आले त्यांनी गाडीतील लोकांना बाहेर काढून जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवलं. काहींना वणी मध्ये तर काहींना नांदुरी मध्ये दाखल करण्यात आले आहे. गाडीने चढ संपवून उतरणीला लागताना चालकाला स्पीड आवरता न आल्याने गाडी पलटली. मालवाहू गाडीतून इतके प्रवासी प्रवास करणं हे धोक्याचे आहे. अशाप्रकारे अवैधरित्या प्रवास करणार्यांना तपास अधिकार्यांनी सोडले कसे? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. नक्की वाचा: Mask Mandate Returns to Temples: शिर्डी च्या साईबाबा ते कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पहा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कोणत्या देवस्थानांमध्ये नववर्ष निमित्त जात असाल तर मास्क सक्तीचा!
दरम्यान नाशिक सह सध्या राज्यात अनेक ठिकाणी सुट्ट्यांचा काळ आणि नववर्षाचं स्वागत यानिमित्ताने भाविकांची मोठी गर्दी आहे. अनेक जण या काळात देवदर्शनाला पसंती देत आहेत. आज मंगळवार असल्याने गडावर देवीच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली होती.