नाशिक मध्ये लवकरच सुरु होणार मेट्रो, राज्य मंत्रिमंडळात प्रकल्पाला मंजुरी

या मेट्रो प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळात बुधवारी मंजुरी देण्यात आली आहे. पार पडलेल्या बैठकीत मेट्रोसाठी 33 किमी लांब मुख्य मार्गिका आण 26 किमी पूरक मार्गिका बनवण्यात येणार असल्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे

मेट्रो सेवा (फोटो सौजन्य-Facebook)

नाशिक (Nashik) मध्ये लवकरच आता मेट्रो (Metro) सेवा सुरु होणार आहे. या मेट्रो प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळात बुधवारी मंजुरी देण्यात आली आहे. पार पडलेल्या बैठकीत मेट्रोसाठी 33 किमी लांब मुख्य मार्गिका आण 26 किमी पूरक मार्गिका बनवण्यात येणार असल्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे. तसेच वीज आणि बॅटरी या दोन्ही उर्जास्रोतांचा वापर यामध्ये केला जातो.

राज्य शासनाने या प्रकल्पासाठी प्रदूषण विरहित, हरित आणि उर्जा प्रेरक अशा विविध गोष्टी लक्षात घेता ही मेट्रो सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तर नाशिक शहराचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांची गरज पाहता मेट्रो सेवा सुरु करणार असल्याच्या निर्णयला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचसोबत नाशिक मधील रस्त्यांची गरज अन्य गोष्टींचा विचार करण्यात येणार आहे.(Ganeshotsav 2019: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी पथकर माफीचे स्टिकर्स 30 ऑगस्टपासून उपलब्ध; पहा कुठे, कशी मिळणार टोलमाफी?)

गंगापूर ते नाशिक रोड रेल्वे ही मुख्य उन्नत मार्गिका क्रमांक 1 असणार आहे. या मार्गात एकूण 20 मेट्रो स्थानके असणार आहे. तर गंगापूर ते मुंबई ही मुख्य उन्नत 2 मार्गिका असून त्यामध्ये 10 मेट्रो स्थानक असणार आहेत. त्यामुळे या दोन मार्गिकांवर मुंबई नाका ते सातपूर कॉलनी असा 11.5 किमी आणि नाशिक - नांदुरनाका मार्गे शिवाजीनगर 14.5 किमी असा मेट्रो मार्ग बांधण्यात येणार आहे.