Nashik Hindi Marathi Controversy: नाशिकमध्ये कुमार विश्वास यांच्या कार्यक्रमात मराठी भाषिकांना प्रवेश नाकारल्यामुळे गोंधळ
आयोजकांपैकी एका व्यक्तीने मराठी भाषिकांना तुम्ही इथे कसे आलात हा प्रश्न विचारल्याचं सांगण्यात आले.
नाशिकमध्ये (Nashik) हिंदी दिवसानिम्मीत (Hindi Divas) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कवी कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांच्या नाशिकमधील एका कवी संमेलनाच्या कार्यक्रमात मराठी भाषिकांना प्रवेश नाकारला आहे. हा कार्यक्रम फक्त हिंदी भाषिकांसाठीच असल्याचं उत्तरही देण्यात आल्याचे यावेळी देण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे त्या कवी कालिदास नाट्यगृहाबाहेर (Mahakavi Kalidas Natyamandir) या कार्यक्रमाच्या स्वागताचे भाजप आमदार सीमा हिरे (BJP MLA Seema Hire) आणि नगरसेवकाचे होर्डिंग दिसत आहे. (हेही वाचा - MHADA Konkan Board Lottery 2023: म्हाडाच्या कोकण विभागातील 5309 घरांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू; 7 नोव्हेंबरला सोडत)
हिंदी दिनानिमित्त हिंदी प्रसारिणी सभा नाशिक द्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचे पास कुठे उपलब्ध होतील याची माहिती मात्र कुठेही देण्यात आले नव्हते. कुमार विश्वास यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ज्यावेळी लोक कालिदास नाट्यगृहाच्या ठिकाणी आले त्यावेळी त्यांना यासाठी पासची गरज असल्याचं सांगण्यात आलं. या कार्यक्रमाचे पास फक्त काही लोकांकडेच असल्याचं दिसून आलं.
कुमार विश्वास यांच्या कार्यक्रमासाठी आलेल्या मराठी भाषीकांना प्रवेश नाकारण्यात आला. आयोजकांपैकी एका व्यक्तीने मराठी भाषिकांना तुम्ही इथे कसे आलात हा प्रश्न विचारल्याचं सांगण्यात आले. दरम्यान कार्यक्रमाचा पास मिळाला नसल्याने काहींनी चुकीचे आरोप केले असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला. जागा कमी आणि लोक जास्त झाल्याने, योग्य नियोजन न झाल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलं.