Women Thrashing Each Other at Nashik Toll Plaza: पैसे भरण्यावरुन वाद; CRPF जवानाची पत्नी आणि महिला टोल कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी, Video Vira

टोल भरण्याच्या वादावरून हा वाद सुरू झाला होता.

Women Thrashing Each Other | (Photo Credits X)

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पिंपळगाव टोल (Pimpalgaon Toll Plaza) नाक्यावर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF Personnel) जवानाची पत्नी आणि टोल नाक्यावरील महिला कर्मचारी यांच्यात जोरदार हाणामारी (Women Thrashing Viral Video) झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दोन महिला परस्परांसोबत शारीरिक हिंसा करताना दिसत आहेत. प्राप्त माहितीनुसार, सीआरपीएफचा जवान, त्याची पत्नी आणि त्यांची दोन मुले पुण्याला निघाले होते. या वळी ही घटना बुधवारी, 14 सप्टेंबर रोजी घडली. व्हिडिओमध्ये दोन्ही महिला आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात.

टोल भरण्यावरुन वाद

सीआरपीएफ जवान ज्या मार्गावरुन पुण्याला निघाला होता तो मार्ग नाशिक जिल्ह्यातून जातो. ज्यावर पिंपळगाव टोल नाका येतो. या नाक्यावर टोल भरण्यासाठी कर्मचाऱ्यांनी या जवानाचे वाहन आडवले. त्या वेळी सदर कर्मचाऱ्याने आपले ओळखपत्र दाखवत टोल भरण्यापासून सवलत मिळावी अशी विनंती केली. मात्र, ही विनंती टोल कर्मचाऱ्यांनी फेटाळून लावली आणि आपण रितसर टोल भरावा अशी मागणीकेली. या वेळी टोल कर्मचारी आणि तो जवान यांच्यात वाद निर्माण झाला. या वादात जवानाची पत्नी उतरली असता तिचा आणि टोलवरील महिला कर्मचारी यांच्यात वाद झाला. दोन महिलांमधील वाद वाढत गेला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. (हेही वाचा, Women Fight For Bus Seat: अशी हाणामारी तुम्ही कधीच पाहिली नसेल! बसच्या सीटसाठी महिलांमध्ये वाद, धक्काबुक्की आणि केस ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल)

महिलांची हाणामारी, बघ्यांची गर्दी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन महिला एकमेकींना मारहाण करताना दिसत आहे. त्यातील एक महिला साडीत तर दुसरी महिला टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याच्या गणवेशात दिसते आहे. दोन्ही महिला आक्रमक झाल्या आहेत. इतक्या की, त्यांनी एकमेकींचे केस पकडून ठेवले आहेत. त्या परस्परांना खेचत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी एकमेकींंना कानशिलातही लगावल्याचे पाहायला मिळते. टोल नाक्यावर भररस्त्यात झालेला हा वाद उपस्थितांच्या उत्सुकतेचा विषय ठरले. हा प्रसंग पाहण्यासाठी आजूबाजुच्या बघ्यांनी गर्दी केली. त्यातीलच कोणीतरी एकाने हे प्रकरण आपल्या मोबाईल कॅमेऱ्याद्वारे चित्रीत केले. ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. सदर व्हिडिओची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. (हेही वाचा, Kolkata Local Train Video: कोलकाता येथे लोकल ट्रेनमध्ये महिलांमध्ये हाणामारी, पाहा व्हिडिओ)

पिंपळगाव टोल नाक्यावर घडली घटना

दरम्यान, व्हिडिओमध्ये असेही पाहायला मिळते की, काही प्रत्यक्षदर्शी घटनेचे ध्वनिचित्रमुद्रन करण्यात मग्न आहेत. तर काहींनी काहींनी हस्तक्षेप करून हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न केला. अखेर काहींनी तत्काळ नाशिक ग्रामिण पोलिसांशी संपर्क साधला. प्रसारमाध्यमांनी याबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, या घटनेत सहभागी असलेल्या कोणत्याही पक्षाने कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही.