नाशिक येथून चारधामला जाणाऱ्या पर्यटन कंपनीच्या बसला भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू

नाशिक (Nashik) येथून चारधामला (Char Dham) जाणाऱ्या एका पर्यटन कंपनीच्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

नाशिक येथून चारधामला जाणाऱ्या पर्यटन कंपनीच्या बसला भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू
Image used for representational purpose | (Photo Credits: ANI)

नाशिक (Nashik) येथून चारधामला (Char Dham) जाणाऱ्या एका पर्यटन कंपनीच्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.या दुर्घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

मंगळवारी रात्री विदशा सागर महामार्गे ही कंपनीची बस जात होते. तसेच बसमध्ये 50 प्रवासी होते. मात्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली आहे. बसमधील सर्व प्रवासी नाशिक येथे राहणारे आहेत.

(ओझर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेस ऑनलाईन हॅकींगद्वारे 1 कोटी 55 लाख 95 हजार रुपयांचा गंडा)

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तर बसमध्ये अडकलेल्या अन्य प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. तर अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या परिवाराला कमलनाथ यांनी 4 लाख आणि जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2019 10:23 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).