नाशिक (Nashik) जिल्ह्यात सध्या अपघाताच्या घटनेमध्ये मोठी वाढ पहायला मिळत आहे. आज ही एक भीषण अपघात नाशिकमध्ये झाल्याची बातमी येत आहे. चांदवडजवळ (Chandwad) कार -कंटेनरच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात धुळ्याच्या एका नगरसेवकाचा देखील समावेश आहे. चांदवडजवळील नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) हा भीषण अपघात झाला आहे. सर्व मृत प्रवासी हे धुळ्यातील (Dhule) रहिवासी असल्याची माहिती आहे. (हेही वाचा - Accident On Mumbai-Goa Highway: रायगडमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर ST Bus ची कंटेनर ट्रकला धडक; एक ठार, 28 जखमी)
दरम्यान मयत सर्व धुळे जिल्ह्यातील असून या अपघातात धुळ्याचे नगरसेवक किरण अहिरराव यांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र इतर मृतांची अद्याप ओळख होऊ शकलेली नाही. अपघात घडल्यानंतर सोमा टोल वेज कंपनीचे पथक आणि पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. या अपघातानंतर काही वेळ महामार्ग ठप्प झाला होता. अपघातातील मृतांची अजून ओळख पटलेली नसून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
धुळे येथील चार प्रवाशी कारमधून नाशिकहून धुळ्याकडे चालले होते. दरम्यान सकाळी सात वाजेच्या सुमारास चांदवडजवळ आले असता नमोकर तीर्थजवळ कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली.