नाशिक: लग्न करण्यासाठी 38 वर्षीय व्यक्तीकडून ब्लॅकमेल, नदीत उडी टाकत 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या

नाशिक (Nashik) येथे लग्नासाठी वारंवार ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून एका 20 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

नाशिक  (Nashik) येथे लग्नासाठी वारंवार ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून एका 20 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तरुणीचा मृत्यू झाला असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रोशनी हिरे असे या तरुणीचे नाव आहे. एका 38 वर्षीय व्यक्तीने तिला लग्न करण्यासाठी वारंवार ब्लॅकमेल करत होता. तर गेल्या काही दिवसांपासून रोशनी हिला हा व्यक्ती लग्न करण्यासाठी गळ घालत होता. तसेच रोशनी हिचे या व्यक्तीने फोटो काढले होते. त्यानुसार फोटोवरुन रोशनी हिला तो त्रास देत होता.(हेही वाचा- 'पश्चिम रेल्वे'च्या लोकल मध्ये सापडले सात दिवसांचे बाळ, पालकांचा शोध सुरु)

यापूर्वी याच आरोपी व्यक्तीमुळे रोशनी हिचा दोन वेळेस लग्न मोडले होते. तर येत्या 20 जून रोजी रोशनी हिचे लग्न होणार होते. परंतु आरोपीने रोशनीच्या होणाऱ्या नवऱ्याला रोशनी आणि माझे संबंध आसल्याचे सांगितले. शेवटी आरोपीच्या त्रासाला कंटाळून रोशनी हिने नदीत उडी टाकत आपले आयुष्य संपवले आहे. तर आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif