'निवडणुकीनंतर मातोश्रीसमोर येऊन कायमचे तोंड बंद करेन', नारायण राणे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना सूचक इशारा
यानंतर नारायण राणे काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु नारायण राणे यांनी निवडणुकीनंतर मातोश्री समोर येऊन कायमचे तोंड बंद करेन असा सूचक इशारा उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election 2019) भाजपचे (BJP) खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सूचक इशारा दिला आहे. याआधी नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशला उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शवला होता. परंतु, याकडे दुर्लक्ष करुन भाजपने नारायण राणें यांना पक्षात प्रवेश दिला होता. यानंतर उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सभेत अनेकदा नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. यानंतर नारायण राणे काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु नारायण राणे यांनी निवडणुकीनंतर मातोश्री समोर येऊन कायमचे तोंड बंद करेन असा सूचक इशारा उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
नुकतीच उद्धव ठाकरें यांची कणकवली येथे सभा पार पडली. दरम्यान, उद्धव ठाकरे 20 मिनिटांच्या या सभेत तब्बल 18 मिनिट नारायण राणे यांच्यावर टीका करत होते. यावर नारायण राणे यांनी सावंतवाडी येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांना खडेबोल सुनावले आहे. त्यावेळी ते म्हणाले की, मी 24 तारखेपर्यंत बोलणार नाही. निवडणूक पार पडल्यानंतर थेट मातोश्रीसमोर येऊन शिवसेनेचे तोंड कायमचे बंद करेल. वाघाच नाव घेणे उद्धवला शोभत नाही. शेळ्या मेंढ्यांचीची नाव उद्धव ठाकरे यांच्या तोंडात शोभतात, असे नारायण राणे म्हणाले आहेत. तसेच कोकणाच्या विकासाठी उद्धव ठाकरे यांनी काय केले आहे, त्यांच योगदान काय शिवसेनेच्या नेत्यांनी काय केले कोणासाठी असे प्रश्नही नारायण राणे यांनी सभेवेळी उपस्थित केले आहेत. हे देखील वाचा- साकोली विधानसभा मतदारसंघात हाणामारी; नाना पटोले यांचा पुतण्या तर परिणय फुके यांचे बंधू गंभीर जखमी.
नारायण राणे यांच्या विधानाला उद्धव ठाकरे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे अशी चर्चा चांगलीच रंगली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. येत्या 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.