भाजप आणि नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलनीकरणाला शिवसेनाचा विरोध

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असल्याची माहिती स्वत: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. तसेच १ सप्टेंबर रोजी नारायण राणे भाजपमध्ये सामील होणार आहेत. परंतु शिवसेना पक्षाने नारायण राणेच्या भाजप प्रवेशावर नाराजी व्यक्त केली आहे.

नारायण राणे ( फोटो फाईल)

विधानसभा (Assembly Election 2019) निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष (maharashtra swabhimaan party) भाजपमध्ये (Bhartiya Janta Party) विलीन होणार आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असल्याची माहिती स्वत: माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिली आहे. तसेच १ सप्टेंबर रोजी नारायण राणे भाजपमध्ये सामील होणार आहेत. परंतु शिवसेना Shivsena पक्षाने नारायण राणेच्या भाजप प्रवेशावर नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने नारायण राणे यांना प्रवेश देऊ नये, अशी इच्छा शिवसेना पक्षाने व्यक्त केली आहे. नारायण राणे याला पक्षात सामील करुन घेणे, म्हणजे दुधात मिठाचा खडा टाकल्यासारखा!, अशी उपमा शिवसेनेकडून नारायण राणे यांच्याबाबतीत देण्यात आली आहे.

याआधीही माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी २०१७ साली भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा दर्शवली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेस (Congress Party) पक्ष सोडले होते. त्यावेळीही शिवसेना पक्षांनी त्यांना विरोध केला होता. त्यानंतर नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. सध्या नारायण राणे भाजपच्या साहाय्याने निवडणूक जिंकून राज्यसभेत पोहचले आहेत. माध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी सांगितले की, १ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हे देखील वाचा-मुकेश अंबानी यांच्याकडून अमित शहा यांचे कौतूक, पाहा काय म्हणाले?

नारायण राणे यांनी शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते म्हणून राजकारणात प्रवेश केला होता. शिवसेनेत असतानाच नारायण राणे मुख्यमंत्री झाले होते. परंतु उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या झालेल्या वादामुळे त्यांनी शिवसेना पक्ष सोडला होता. शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. यामुळे शिवसेना पक्षाने नारायण राणेच्या भाजप प्रवेश संकल्पनेला विरोध केला आहे.