Deepak Kesarkar on Narayan Rane: नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर खोटे आरोप केले- दीपक केसरकर
नारायण राणे (Narayan Rane) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर खोटे आरोप केले होते. त्यामुळे ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारे आणि शिवसेनेतील आम्ही सर्वच जण व्यथित झालो होतो, असेही केसरकर यांनी म्हटले आहे.
ठाकरे कुटुंबीयांबद्दल आजही आमच्या मनात प्रेम आणि आदर आहे. तो कायम राहील. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी कितीही टीका केली तरीही आम्ही त्याला प्रत्युत्तर देणारनाही. कारण ते ठाकरे कुटुंबातील सदस्य आहेत. मात्र, आदित्य ठाकरे यांनीही टीका करताना संयम ठेवावा असे अवाहन एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केले आहे. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. नारायण राणे (Narayan Rane) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर खोटे आरोप केले होते. त्यामुळे ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारे आणि शिवसेनेतील आम्ही सर्वच जण व्यथित झालो होतो, असेही केसरकर यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
दीपक केसरकर यांनी म्हटले की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्या नारायण राणे यांचा मोठा वाटा होता. आदित्य ठाकरे यांची बदनामी केल्यामुळे व्यथीत होऊन आम्ही त्या वेळी भाजपलाही जाब विचारला होता. अशा प्रकारचे चुकीचे आरोप करायला नको होतो. आम्ही त्या वेळी पंतप्रधानांपर्यंतही आमच्या भावना पोहोचवल्याचा दावा केसरकर यांनी केला. (हेही वाचा, CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थकवा, डॉक्टरांकडून सक्त विश्रांतीचा सल्ला; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना)
आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी वैयक्तीक चर्चा केली होती. आम्हाला ठाकरे कुटुंबीयांविषयी प्रेम आणि आदर असल्यानेच मी आपल्या भावना पंतप्रधानांपर्यंत पोहोचवल्या होत्या, असे दीपक केसरकर यांनी म्हटले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या बदनामीमुळे सर्वजच जण नाराज होते. त्याची दखलही पंतप्रधानांनी घेतली होती. मात्र, विधानसभेमध्ये भाजपचे 12 आमदार निलंबीत करण्यात आले. त्यामुळे सर्व प्रकरण बिघडले. पुढेनारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले. भाजप-शिवसेना संबंधही ताणले गेले.
दरम्यान, शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याबाबत उद्धव ठाकरे राजी होते. मात्र, नव्याने घेतलेली राजकीय भूमिका स्वीकारुन त्यात बदल करण्यासाठी काही वेळ आवश्य लागणार आहे. शिवसैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांनाही त्याबाबत सांगावे लागणार होते. त्यामुळे उद्धवजींनी काहीसा अवधी घेतला होता. मात्र, तोवर भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन झाले आणि सर्वच गणीत बिघडले, असे दीपक केसरकर म्हणाले.