नंदूरबार: भाजपच्या महिला खासदार डॉ. हिना गावित लवकरचं लग्नाच्या बेडीत अडकणार; पहा कोण आहेत त्यांचे होणारे पती

हिना गावित (Heena Gavit) लवकरचं लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. डॉ. तुषार वळवी यांच्याशी त्या विवाहबद्ध होणार आहेत. नुकताच हिना गावित यांचा मुंबईमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. डॉ. तुषार वळवी हे एम डी डॉक्टर असून ते मुंबईमध्ये काम करतात. नंदूरबार जिल्ह्यातील हातधुई हे वळवी यांचं गाव आहे. डॉ. वळवी आणि हिना गावित यांच्या साखरपुड्याला काही मोजके नातेवाईक व मित्रमंडळींची उपस्थिती होती.

Heena Gavit (PC - facebook)

नंदूरबार (Nandurbar) लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या महिला खासदार डॉ. हिना गावित (Heena Gavit) लवकरचं लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. डॉ. तुषार वळवी यांच्याशी त्या विवाहबद्ध होणार आहेत. नुकताच हिना गावित यांचा मुंबईमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. डॉ. तुषार वळवी हे एम डी डॉक्टर असून ते मुंबईमध्ये काम करतात. नंदूरबार जिल्ह्यातील हातधुई हे वळवी यांचं गाव आहे. डॉ. वळवी आणि हिना गावित यांच्या साखरपुड्याला काही मोजके नातेवाईक व मित्रमंडळींची उपस्थिती होती.

हिना गावित या माजी मंत्री विजय गावित यांच्या कन्या आहेत. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान हिना गावित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. डॉ. हिना गावित यांचा जन्म 26 जून 1987 मध्ये झाला. त्यांनी MBBS, MD ची पदवी घेतली आहे. हिना गावित यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा नंदुरबारमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचा पराभव केला होता. (हेही वाचा - खासदार डॉ अमोल कोल्हे आणि डॉ. हिना गावित यांच्या लोकसभेतील भाषणाला नरेंद्र मोदींनी दिली कौतुकाची थाप (Watch Video))

हिना गावित यांनी अगदी कमी वेळेत आपले कर्तृत्व गाजवले आहे. लोकसभेत हिना गावित नेहमी जनतेचे प्रश्न उचलून धरत असतात. हिना गावित यांच्या या नेतृत्व गुणामुळे त्यांना उत्कृष्ट खासदार म्हणून पुरस्कार मिळाला होता. खासदार गावित यांनी आतापर्यंत संसदीय मंडळाबरोबर ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, मलेशिया, न्यूझीलॅंड, सिंगापूर, इंग्लंड, स्वित्झर्लंड आदी देशांचे परदेश दौरे केले आहेत.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी लोकसभेत हिना गावित आणि डॉ. अमोल कोल्हे यांचे कौतुक केले होते. हिना गावित यांनी आदिवासी संदर्भात मांडलेले मुद्दे ऐकल्यानंतर आता मी काय बोलू, असा प्रश्न मला पडला आहे, अशा शब्दात मोदींनी गावित याचं कौतुक केलं होतं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. हिना गावित यांनी 90 हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला होता. हिना गावित या नंदूरबार मतदारसंघातून दुसऱ्यांदा खासदार झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत हिना गावित यांना 5 लाख 84 हजार 828 मते मिळाली होती. नंदूरबार मतदारसंघात इतकी वर्षं इथे काँग्रेसचं वर्चस्व होतं. मात्र, गेल्या निवडणुकीत डॉ. हीना गावित यांनी काँग्रेसची ही मक्तेदारी मोडून काढली आहे.