नंदूरबार येथे गणपती विसर्जनासाठी नदीत उतरलेल्या 6 जणांचा बुडून मृत्यू

या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Drowning | Representational Image| (Photo Credits: PTI)

देशभरात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) सण साजरा केला जात असून सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. तर आज पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी नंदूबार (Nandurbar) येथे नदीत गणपती विसर्जनासाठी उतरलेल्या 6 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज संध्याकाळच्या वेळेस वडछिल येथे पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी लोक आली होती. त्यापैकी काही जण नदीत गणपतीला निरोप देण्यासाठी नदीत उतरली. परंतु नदीमधील पाण्याचा अंदाज न आल्याने सहा जण बुडाले. त्यानंतर घटनास्थळी तातडीने बचाव कार्य सुरु करण्यात आले.(Ganeshotsav 2019: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! बाप्पाच्या विसर्जना निमित्त मध्य रेल्वेच्या 20 विशेष लोकल फे-या, या दिवशी चालविण्यात येणार या रेल्वेगाड्या)

तर नदीत बुडालेल्या सहा जणांचे मृत देह बाहेर काढण्यात आले आहे. परंतु गावातील एका रुग्णालयात मृत झालेल्या व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.