Nanded Murder And Rape Case: धक्कादायक! सहा वर्षाच्या मुलीची बलात्कार करून हत्या, नांदेड पोलिसांकडून आरोपीला अटक
Nanded Shocker PC twitter

Nanded Murder And Rape Case: नांदेड जिल्ह्यात रोही पिंपळगाळ येथील सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केले आहे. दशरथ उर्फ फुलाजी पांचाळ असं आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर नांदेड जिल्हा संपुर्ण हादरलं होता. १४ जानेवारी रोजी रोही पिंपळगाव येथील सहा वर्षीय मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी हत्तेचे उलगडा करत आरोपीला पकडले आहे. पोलिसांनी सहा तपास पथके तयार केले होते. (हेही वाचा-  पिपंरीचिंचवड येथे दीराला पोलिसांत पकडून दिल्याच्या रागात पत्नीचा खून, )

मिळालेल्या माहितीनुसार, 14 जानेवारी रोजी पिंपळगावातील एक मुलगी घराजवळ असलेल्या शाळेसमोरील शेतातून बेपत्ता झाली होती. तिच्या घरांनी पोलिसांत तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी मुलीचा मृतदेह सापडल्याने गावात मोठी खळबळ उडाली होती. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मुलीचा बलात्कार झाल्याचे अहवालात आले. पोलिसांनी गावात गोपनीय बामतीदार नेमले त्यानंतर गोपनीय माहितीनुसार, गावात एका संशयीत आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी  संशयीत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीचे नाव दशरत नाव असून तो गावात मजूरीचे काम करायचा.पोलिसांनी कंबर कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

संशयिताला न्यायालयात हजर केले असता ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक करीत आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी असल्याचा संशय पोलिसांना आला आहे. या घटनेनंतर गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.