Nanded Accident: मॉर्निग वॉकसाठी निघालेल्या दोन मुलाचा अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्यू, गुन्हा दाखल, नांदेड शहारातील घटना
या अपघातात मॉर्निंग वॉक करणाऱ्या २ शालेय विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
Nanded Accident: बीड शहरात कंटनेर आणि पिकअपच्या धडकेत भीषण अपघात झाल्याची घटना ताजी असताना, नांदेड शहरातील भोकर तालुक्यात अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात मॉर्निंग वॉक करणाऱ्या 2 शालेय विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनांच्या धडकेत अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई- निर्मल राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. शुक्रवारी सकाळी 5च्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे भोकर तालुक्यातील भोसी गावात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- पिकअप आणि कंटेनरची जोरदार धडक, बीड येथील भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या भोकत तालुक्यातील भोसी गावात एका अज्ञात वाहनाची २ मुलांना धडक बसली. सकाळी मुले मॉर्निंग वॉकसाठी आले होते. दरम्यान सकाळीच अपघात झाला. अपघाताची माहिती गावात पसरताच, घटनास्थळी गर्दी झाली. दोन्ही मुलांच्या मृत्यू मुळे गावात शोककळा पसरली. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक फरार झाला. नांदेड भोकर मार्गावरील भोसी गावाच्या महामार्गावरून हे दोन्ही मुले रस्त्यातून जात होते. पाठी मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दोघांना चिरडले. यात दोघांचा मृत्यू झाला.
गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या अघाताची नोंद घेतली असून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. संकेत पाशेमवाड (17) आणि वैभव येळने (18) या दोन मुलांचा मृत्यू झाला. दोघांचा मृत्यूनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.