राजकीय जाहिरातदारांची नावे सोशल मीडियावर प्रसिद्ध होणार

मात्र आता राजकीय जाहिराती देणाऱ्यांची नावे आणि जाहिरांतीवरील खर्च फेसबुककडून दाखवण्यात येणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

आगामी लोकसभेसाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून जोरात तयारी सुरु झाली आहे. तसेच सध्या विविध राज्यात पोस्टरबाजीवरुन फटकारे मारले जात आहेत. तर पोस्टरबाजी करण्यासाठी काही जाहिरात कंपन्यांना ठरवून दिलेल्या पद्धतीने पोस्टर बनविण्याचे काम सोपविले जाते. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाचे पोस्टर पाहिले असता प्रत्येक वेळी नवीन पद्धतीचे दिसतात. मात्र आता राजकीय जाहिराती देणाऱ्यांची नावे आणि जाहिरांतीवरील खर्च फेसबुककडून दाखवण्यात येणार आहे.

येत्या 21 मार्च पासून राजकीय जाहिरातींसाठी नवे धोरण लवकरच लागू केले जाणार आहे. यामध्ये राजकीय जाहिरातदाराचे नाव दिले जाणार असून त्याचे फेसबुक पेज पाहता येणार आहे. तसेच फेसबुकवर जाहिरातींची एक लायब्ररी बनवण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या पक्षाच्या राजकीय जाहिरातीची माहिती सहज मिळू शकणार आहे.(हेही वाचा-मुंबईतील भ्रष्टाचाराच्या विळख्यातील 'प्रतिभा टॉवर' अखेर 35 वर्षानंतर पाडण्याचे काम महापालिकेकडून सुरु)

तर आचारसंहितेच्या काळात फेसबुकवर राजकीय जाहीरात पोस्ट केल्यास त्याचा खर्च निवडणुर खर्चात समाविष्ट करण्यात येणार असल्याचा निर्णय निवडणुक आयोगाने घेतला आहे. नव्या नियमांमुळे जाहिरात कोणत्या देशातून प्रदर्शित करण्यात आली आहे हे सुद्धा आता सर्वसामान्यांना कळणार आहे.