उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्री; एकनाथ शिंदे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह या दिग्गज चेहऱ्यांना मिळू शकते संधी

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अशा तिन्ही पक्षांचा समावेश असलेल्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात या तिन्ही गटनेत्यांसोबत इतरही अनेक चेहऱ्यांचा समावेश असणार आहे. या संभाव्य चेहऱ्यांच्या नावावर टाकलेली ही एक नजर.

Uddhav Thackeray Cabinet | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

भाजपसोबत झालेल्या सत्तासंघर्षात अखेर महाविकासआघाडी विजयासमीप पोहोचली. परिणामी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) शिवाजी पार्क (Shivaji Park)  (शिवतिर्थ)  येथे उद्या गुरुवारी (28 नोव्हेंबर 2019) सायंकाळी 6.40 वाजता मुखमंत्री (Chief Minister Uddhav Thackeray) पदाची शपथ घेत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या रुपाने पहिलाच ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसत आहे. तर दुसरा ठाकरे राजकारणाच्या केंद्रस्थानी येत आहे. शिवतिर्थावर शपतविधी सोहळ्याची तयारी सुरु आहे. त्यासोबतच महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळाचीही (Uddhav Thackeray Cabinet) चर्चा सुरु आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अशा तिन्ही पक्षांचा समावेश असलेल्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात या तिन्ही गटनेत्यांसोबत इतरही अनेक चेहऱ्यांचा समावेश असणार आहे. या संभाव्य चेहऱ्यांच्या नावावर टाकलेली ही एक नजर.

शिवसेना

Uddhav Thackeray Cabinet, Shiv Sena | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

शिवसेना पक्षातून उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात  एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील या नावांची चर्चा आहे.

राष्ट्रवादी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटिल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, मकरंद पाटील आणि राजेश टोपे या नावांची चर्चा आहे.

Uddhav Thackeray Cabinet, NCP | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

काँग्रेस

राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, केसी पाडवी, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, सतेज बंटी पाटील आणि सुनिल केदार या आमदारांच्या नावांची चर्चा आहे.

Uddhav Thackeray Cabinet, Congress | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

पक्षीय बलाबल

दरम्यान, राज्यातील पक्षीय बलाबल पाहता भाजप (BJP) – 105, शिवसेना (Shiv Sena) – 56, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) – 54, काँग्रेस(Congress) – 44, बहुजन विकास आघाडी – 03, प्रहार जनशक्ती – 02, एमआयएम – 02, समाजवादी पक्ष – 02, मनसे – 01, माकप – 01, जनसुराज्य शक्ती – 01, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01, शेकाप – 01, रासप – 01, स्वाभिमानी – 01, अपक्ष – 13 जागांवर विजयी झाले आहेत. (हेही वाचा, उद्धव ठाकरे उद्याच घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ; राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात उपमुख्यमंत्री-सूत्र)

दरम्यान, राज्याच्या राजकारणात गेले तीन-चार दिवस चांगलेच वादळी ठरले. या वादळाची सुरुवात राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवल्यापासून झाली. राज्यातून राष्ट्रपती राजवट कधी हटवली गेली आणि राज्यावर नवे सरकार कधी अस्तित्वात आले याचा जनतेला बराच काळ पत्ता लागला नाही. जेव्हा प्रसारमाध्यमांतून वृत्त झळकले तेव्हा जनतेला राज्यात नवे सरकार अस्तित्वात आल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात राज्यात सत्तेवर आलेले सरकार, राज्यपालांचा निर्णय आणि एकूणच सर्व प्रपंच सगळेच वादाच्या भोवऱ्यात सापडले. हा वाद अखेर सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. त्यानंतर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आणि त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घटना घडामोडींनतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर या नाट्यावर पडदा पडला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now