Nalasopara Crime: दुचाकीचा धक्का लागल्याच्या वादातून तरुणाची भरदिवसा हत्या; तीनही आरोपी फरार

याप्रकरणी नालासोपारा पोलीसांनी तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या हे तीघेही फरार आहेत

Dead-pixabay

नालासोपाऱ्यात शुल्लक कारणावरून खूनांसारखे गंभीर गुन्हा घडल्याचे समोर आले आहे. दुचाकीच्या आरशाच्या धक्का लागल्याने झालेल्या वादातून एका तरुणाची भरदिवसा हत्या करण्यात आली. नालासोपारा (Nalasopara) उड्डाणपूलावर रविवारी संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास ही घटना घडली. हत्या करणारे तिन्ही आरोप फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. (हेही वाचा - Mumbai Shocker: वांद्रे भागात बुडाली 27 वर्षीय तरूणी)

रोहित यादव या 20 वर्षीय तरुणाचे नाव असून तो नालासोपारा  पुर्वेला असलेल्या संतोष भूवन येथील रहिवाशी होता. रोहित आणि त्याचा मित्र विवेक हे रविवारी सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून नालासोपारा पूर्वेला जात होते. नालासोपारा उड्डाणपूलावरून जात असताना त्यांच्या दुचाकाने दुसर्‍या एका दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.या प्रयत्नात त्यांच्या दुचाकीचा धक्का दुसर्‍या दुचाकीच्या आरशाला लागला. दरम्यान, दुचाकीवर असलेल्या तिन्ही तरुणांनी रोहित आणि त्याच्या मित्राला मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत रोहीत यादव याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने नालासोपारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी नालासोपारा पोलीस (Police) ठाण्यात तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी ओव्हरटेक करताना मयताच्या दुचाकीचा धक्का आरोपींच्या दुचाकीला लागला. यावरून वाद होऊन त्याला मारहाण करण्यात आली होती, अशी माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी दिली.