Nagpur Winter Session 2019: अर्थमंत्री जयंत पाटील यांनी नुकसानग्रस्त आणि पूरग्रस्त शेतक-यासांठी केंद्र शासनाकडे केली 14,600 कोटी रुपयांची मागणी

तसेच विरोधी पक्ष नेत्यांनी नव्या सरकारवर आपले टीकास्त्र सोडत जनतेच्या अनेक महत्त्वाच्या मागण्यांचा मुद्दा उचलून धरला.

Representative Image (Photo Credits: twitter)

राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सोमवारपासून (16 नोव्हेंबर 2019) पासून नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु झाले. या अधिवेशनात महाविकासआघाडीच्या नेत्यांनी अनेक महत्त्वाचे विशेषत: शेतक-यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मागण्या उचलून धरल्या आहेत. यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना मदतीसाठी राज्य शासनाने 6,600 कोटी मंजूर केले असून त्यातील 2100 कोटी रुपये वितरित झाल्याचे अर्थमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले. तसेच विरोधी पक्ष नेत्यांनी नव्या सरकारवर आपले टीकास्त्र सोडत जनतेच्या अनेक महत्त्वाच्या मागण्यांचा मुद्दा उचलून धरला.

यात गेल्या कित्येक दिवसांपासून जोर धरू लागलेल्या नुकसानग्रस्त शेतक-यांना मदतीच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात राज्य शासनाने 6,600 कोटी रुपये मंजूर केले असून त्यातील 2100 कोटी रुपयांचे वितरणही करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा- नागपूर हिवाळी अधिवेशन 2019: देवेंद्र फडणवीस यांच्यासहित भाजप नेत्यांनी 'मी पण सावरकर' लिखित टोपी घालून केली विधान भवनात एंट्री

तसेच पूरग्रस्तांच्या मदतीकरिता राज्य शासनाने 14,600 कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे असे अर्थमंत्री जयंत पाटील हे यावेळी म्हणाले.

तर दुसरीकडे महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस देखील गदारोळाचा ठरला. आजच्या दुसर्‍या दिवसाचे काम सुरू होताच सभागृहामध्ये शिवसेना आणि भाजपा आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि भाजपा आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) आज भिडले. त्यानंतर सभापती नाना पटोले (Nana Patole) यांनी मध्यस्थी करत हे कृत्य अशोभनीय असून संबंधित आमदारांना समज दिली आहे. तासाभराच्या कामकाजानंतर आज विधिमंडळाचे काम दिवसभरासाठी तहकूब झाले आहे.



संबंधित बातम्या