Nagpur Shocker: जोडप्याने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व मर्यादा; 12 वर्षाच्या मुलीला दिले गरम पॅन आणि सिगारेटचे चटके

12 वर्षांच्या मुलीला या जोडप्याने चटके देण्यासाठी गरम तवा, गरम चाकू आणि सिगारेटचा वापर केला. एवढेच नाही तर या जोडप्याने बेंगळुरूच्या प्रवासादरम्यान मुलीला सोडून दिले.

Nagpur Shocker: जोडप्याने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व मर्यादा; 12 वर्षाच्या मुलीला दिले गरम पॅन आणि सिगारेटचे चटके
Girl | Representational image (Photo Credits: pxhere)

Nagpur Shocker: नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील एका जोडप्याकडून त्यांच्या 12 वर्षांच्या मोलकरणीला भयंकर छळाला सामोर जाव लागलं. या जोडप्याने माणूसकीला काळीमा फासत चिमुरडीला संपूर्ण शरीरावर गरम पॅन आणि सिगारेटने चटके दिले. मिळालेल्या माहितीनुसार, 12 वर्षांच्या मुलीला या जोडप्याने चटके देण्यासाठी गरम तवा, गरम चाकू आणि सिगारेटचा वापर केला. एवढेच नाही तर या जोडप्याने बेंगळुरूच्या प्रवासादरम्यान मुलीला सोडून दिले.

प्राप्त माहितीनुसार, नागपुरातील अथर्व नागरी सोसायटीतील दाम्पत्याच्या घरगुती कामासाठी 12 वर्षीय मुलीला तीन वर्षांपूर्वी बेंगळुरू येथून आणण्यात आले होते. एनजीओ कार्यकर्ता शीतल पाटील यांनी सांगितले की, पीडितेने घरातील कामात कोणतीही चूक केली की, हे जोडपे तिला गरम भांडे किंवा सिगारेटने चटके द्यायचे. हे बऱ्याच दिवसापासून चालू होते. लाजिरवाणी बाब म्हणजे हे जोडपे पीडितेला घरात बंद करून चार दिवस बेंगळुरूला गेले आणि त्या दरम्यान घरातील वीज गेली. (हेही वाचा - Pune News: दोन शेतमजूरांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद, कोयत्याने वार करत केली हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना)

दरम्यान, मुलीला संधी मिळताच तिने फोन करून मदत मागितली. पीडितेच्या आरडाओरडा शेजाऱ्यांपर्यंत पोहोचला. त्यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा तोडला. त्यांना 12 वर्षीय पीडिता घाबरलेल्या अवस्थेत दिसली. यावेळी शेजाऱ्यांना मुलीच्या अंगावर चटके दिलेल्या अनेक खुणा दिसल्या.

पोलीस अधिकारी विक्रांत सांगणे यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना घटनेची माहिती मिळाली तेव्हा पीडितेची कसून वैद्यकीय तपासणी करण्यात आली, ज्याचा अहवाल अत्यंत चिंताजनक होता. आरोपी जोडप्याला बेंगळुरू पोलिसांनी अटक करून नंतर नागपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2023 01:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).