'वो बुलाती है मगर जाने का नही' ऑनलॉईन दारू खरेदी करणाऱ्या नागरिकांना नागपूर पोलिसांकडून सावधानीचा इशारा
दरम्यान, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून काही दिवसांपूर्वी मद्य खरेदीसाठी दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्यावेळेस तळीरामांनी दारू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) आजपासून घरपोच दारू विक्री पोहचवण्याची सोय खुली केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून काही दिवसांपूर्वी मद्य खरेदीसाठी दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्यावेळेस तळीरामांनी दारू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे राज्यसरकारने दारु विक्रीचा निर्णय मागे घेतला होता. महाराष्ट्रात आता पुन्हा दारु विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना घरपोच सेवा पुरवली जाणार आहे. परंतु, ऑनलाईन दारू खरेदी करण्यासाठी नागरिकांना ऑटीपी विचारला जाणार आहे. दरम्यान, नागरिकांनी सावधानी बाळगावी आणि कोणत्याही व्यक्तीला ओटीपी शेअर करून नका, असे आवाहन नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) केले आहे.
दरम्यान दारू विक्रेत्यांना फोनवरून, मेसेजिंग अॅपवरून दारूची ऑर्डर स्वीकरावी लागणार आहे. त्यासाठी ग्राहकांना संबंधित क्रमांक देणे, दुकानाबाहेर लिहण्याची सोय करावी, असे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जारी केलेल्या पत्रकामध्ये सांगण्यात आले होते. त्यानुसार, ग्राहकांना ओटीपी विचारला जात आहे. ऑनलाईन दारू खरेदी करताना नागरिकांची फसवणूक होऊ नये, म्हणून नागपूर पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना सावधानीचा इशारा दिला आहे. हे देखील वाचा- मुंबई: अॅन्टॉप हिल येथील गरीब नवाज परिसरात स्थानिकांनी मास्क न घालण्यावरुन वाद झाल्यानंतर पोलिसांवर धारदार शस्राने हल्ला, 3 कर्मचारी जखमी
नागपूर पोलिसांचे ट्वीट-
महाराष्ट्रात दिवसेगणिक कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ होत असल्याचे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 27 हजार 524 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 1,019 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 6,059 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.